विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:13 IST2025-06-21T15:08:27+5:302025-06-21T15:13:01+5:30

१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता.

Deepak Pathak's body cremated 9 days after plane crash | विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बदलापूर : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृतदेह आज बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. यावेळी बदलापूरकरांनी साश्रूनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दीपकचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता. मात्र डीएनए टेस्ट करून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी गेला. अखेर अपघाताच्या ९ व्या दिवशी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. आज दीपक यांचा मृतदेह बदलापूरच्या कात्रप परिसरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. तिथे बदलापूरकरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. अंत्यदर्शनानंतर बदलापूरमध्ये दीपक यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Web Title: Deepak Pathak's body cremated 9 days after plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.