शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:45 PM

उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका, याचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील

ठळक मुद्देउच्च न्यायालयात दाखल केली होती याचिकायाचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासमोर एक अनोखीच याचिका आली. यामध्ये याचिकाकर्त्यानं ब्रिटीश राजघराण्याच्या प्रिन्स हॅरी यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. प्रिन्स हॅरी यांनी आपल्याला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, जे पूर्ण झालेलं नाही, असं याचिकाकर्त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं. याचिकाकर्त्यानं प्रिन्स हॅरी यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्याचीही मागणी केली. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करत असताना याचिकाकर्त्या हे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत आहेत, असं न्यायालयानं म्हटलं. आश्चर्याची बाब म्हणजे याचिकाकर्त्या एक वकील आहेत. त्या स्वत: खटला लढवण्यासाठी न्यायालयात पोहोचल्या होत्या. न्यायालयानं विशेष अर्जावर न्यायालयाच्या थेट सुनावणीस मंजुरी दिली. दरम्यान, लग्न करण्यास अजून विलंब होऊ नये यासाठी प्रिन्स हॅरी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. लाईव्ह लॉ नुसार त्यांनी न्यायालयाला काही ईमेलदेखील दाखवले. याचिकाकर्त्या महिलेनुसार ते प्रिन्स हॅरी यांनी पाठवले असून त्यांनी लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. सुनावणी दरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्या महिलेल्या त्या कधी युनायडेट किंगडमला गेल्या आहेत का अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना त्यांनी आपण त्या ठिकाणी कधीही गेलो नसल्याचं म्हटलं. आपलं प्रिन्स हॅरी यांच्याशी केवल सोशल मीडियाद्वारे बोलणं होत होतं असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली. "फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडिया साईट्सवर बनावट आयडी तयार केले जातात हे सत्य काही लपलेलं नाही. हे प्रिन्स हॅरी हे पंजाबच्याच कोणत्यातरी गावात बसले असतील," असंही न्यायमूर्ती अरविंद सिंग सांगवान यांनी याचिका फेटाळताना म्हटलं. 

टॅग्स :Englandइंग्लंडHigh Courtउच्च न्यायालयPunjabपंजाबHaryanaहरयाणाmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटर