शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

‘डार्क फ्रेम’ डर्बन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

By admin | Updated: June 8, 2016 19:39 IST

गोमंतकातील कलाकार भूपेश बांदेकर यांनी साकारलेल्या ‘डार्क फ्रेम’ या चित्रपटाची निवड पुढील महिन्यात साउथ आफ्रिका येथे होणाऱ्या ३७व्या डर्बन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. ८ -  गोमंतकातील कलाकार भूपेश बांदेकर यांनी साकारलेल्या ‘डार्क फ्रेम’ या चित्रपटाची निवड पुढील महिन्यात साउथ आफ्रिका येथे होणाऱ्या ३७व्या डर्बन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवात देशातून केवळ तीन चित्रपटांची निवड झाली आहे. साळगाव येथील भूपेश शंभू बांदेकर हे व्यावसायाने वकील असून कलाकार होण्याची आवड आहे. सध्या ते मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय करत असून आवड म्हणून चित्रपट, जाहिरातींमध्ये भूमिका करतात.डिजिटल जगात आपण अनाकलनीयपणे गुंतत चाललो आहोत. या जगात वावरताना आपल्यातील भावना आणि प्रेम यांची व्याख्याही बदलली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या आणि डिजिटल जगाचे बळी ठरलेल्या नवीन दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित ‘डार्क फ्रेम’ ही कथा आहे. डिजिटल जगात वावरताना, त्यांच्या आहारी जाताना किंवा बळी ठरल्यानंतर नातेसंबंधांची वीण कशापद्धतीने उलगडावी आणि कायम ठेवावी या विषयावर ही कथा बांधली आहे.

गोवा फिल्म बाजारमध्ये समावेश ‘डार्क फ्रेम’ ही दिग्दर्शक नवीन चंद्र गणेश यांचा चित्रपट असून गतवर्षी कोच्ची, केरळ येथील चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर दाखविण्यात आला आहे. एनएफडीसी फिल्म बाजार २0१५ गोवा याचा भागही बनली होती. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत भूपेश यांच्या समवेत कोलकाता येथील कलाकार अर्पिता बॅनर्जी यांनी भूमिका साकारल्या आहेत.