शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

अभ्यासक्रमात बायाे टाॅयलेट्सचा समावेश, रेल्वेची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 2:55 AM

रेल्वेची मंजुरी: आयएसबीने केला हाेता अभ्यास

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये जैव-शाैचालयांचा (बायाे टाॅयलेट्स) वापर सुरू केला. याचा सखाेल अभ्यास करण्यात आला असून त्याचा व्यवस्थापन अभ्यासक्रमात समावेश करण्यास रेल्वेने मंजुरी  दिली आहे. ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’ने (आयएसबी) जैव-शाैचालयांवर अभ्यास केला हाेता. त्यास रेल्वेने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे. अभ्यासादरम्यान घेण्यात आलेली छायाचित्रेही वापरण्याबाबत परवागी देण्यात आली आहे. या केस स्टडीचा इतर शैक्षणिक संस्थादेखील अभ्यासक्रमात वापर करू शकतात, असेही रेल्वेने दिलेल्या परवानगी पत्रात म्हटले आहे.

रेल्वेने डीआरडीओच्या सहकार्याने जैव-शाैचालयांचे तंत्रज्ञान विकसित केले हाेते. भारतीय रेल्वेचे देशभरात खूप माेठे जाळे आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान रेल्वे डब्यांमध्ये वापरणे माेठ्या जिकिरीचे काम हाेते. जैव-शाैचालये पर्यावरण पूरक आहेत. रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी याची खूप मदत हाेते.  तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे रुळ गंजण्याचे प्रमाण यामुळे कमी झाले आहे. परिणामी रेल्वेची माेठी बचतही झाली आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. डब्यांमध्ये दुर्गंधीबाबत तक्रारी वाढत हाेत्या. त्यावरही रेल्वेने मार्ग काढला. नवीन एलएचबी वातानुकूलित डब्यांमध्ये विमानांमध्ये वापरतात त्याप्रमाणे बायाे व्हॅक्यूम शाैचालये लावण्यात येणार आहेत. लाॅकडाऊनच्या काळात आतापर्यंत ८०० डब्यांमध्ये हे काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. संपूर्ण कामासाठी १५०० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :railwayरेल्वे