शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते? मरकजवरून शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 20:07 IST

Coronavirus: निजामुद्दीन मरकज प्रकरणावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मुंबई: कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दिल्लीत गेल्या महिन्यात तबलिगी समाजाकडून मरकजचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानं खळबळ माजली आहे. तबलिगी समाजाचे शेकडो जण विविध राज्यांत परतल्यानं देशातल्या राज्य सरकारांचे धाबे दणाणले आहेत. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आता दंडुके मारणारे पोलीस तेव्हा कुठे होते, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतले पोलीस मोदी, शहांच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यांना वेळीच आदेश का देण्यात आले नाहीत, असा प्रश्नदेखील राऊत यांनी विचारला.देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे देशद्रोह असल्याचं राऊत म्हणाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. देशात संवेदनशील परिस्थिती असताना अशा प्रकारची कृती म्हणजे मस्तवालपणा आणि मूर्खपणा आहे. फरहान अख्तर, जावेद अख्तर, नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्यासारख्यांनी यावर टीका केली आहे. मात्र त्या समाजाचे नेते यावर मूग गिळून गप्प आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे दोन सरकारं काम करतात. १८ मार्चला निझामुद्दीन भागात झालेल्या कार्यक्रमाला शेकडो लोकांची गर्दी झाली. कोरोनाचा धोका वाढत असताना इतक्या झुंडी येत असल्याचं दोन्ही सरकारांच्या लक्षात आलं नाही का? की त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलली?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिल्लीतील पोलीस यंत्रणा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या नियंत्रणाखाली येते. सध्या चार लोक दिसताच दंडुके मारणारे पोलीस त्यावेळी इतक्या झुंडी येत असताना काय करत होते?, असा सवाल विचारत त्यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्याची परिस्थिती पाहता केंद्रानं निर्घृणपणे आणि अमानुषपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंदेखील राऊत यांनी म्हटलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाSanjay Rautसंजय राऊतAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल