शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 4 लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; देशातील परिस्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 11:51 IST

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. (coronavirus in india)

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत 403,738 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4092 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,86,444 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 401,078 नव्या कोरोनाबाधितांचं देशात निदान झालं होतं. 

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. दिलासादायक बाब ही, की 24 तासांत देशभरातून 3 लाख 86 हजार 444 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी  83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

देशातील कोरोना मृत्यूदरात वाढ झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 82 टक्क्यांहून कमी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 17 टक्क्यांहून अधिक झाली आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्ठानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 

महाराष्ट्रात दिवसभरात 82 हजार 266 रुग्ण, तर 864 मृत्यू

राज्यात शनिवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यात दिवसभरात 82 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यत एकूण 43 लाख 47 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात 53 हजार 605 रुग्ण तर 864 मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.03 टक्के असून मृत्युदर 1.49 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 91 लाख 94 हजार 331 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.31 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 37 लाख 50 हजार 502 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28 हजार 453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूCentral Governmentकेंद्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस