शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

CoronaVirus News: 30 जानेवारीपासून देशात 'असा' वाढत गेला कोरोनाचा कहर, केवळ 26 दिवसांत आढळले 1 लाखहून अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:42 AM

नवी दिल्ली :  भारतात करोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 6387 नवे रुग्ण ...

ठळक मुद्देकेवळ 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखवरून दीड लाखवर गेली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 6387 नवे रुग्ण आढळून आले.भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता.

नवी दिल्लीभारतात करोना व्हायरसचा कहर वाढतच चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 6387 नवे रुग्ण आढळून आले. यानंतर आता देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखवरून दीड लाखवर गेली आहे. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत चाललेली ही संख्या देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

केवळ मे महिन्यातच समोर आले एक लाखहून अधिक रुग्ण :भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला आढळून आला होता. यानंतर फेब्रुवारीपर्यंत याचा वेग कमी होता. 30 एप्रिलपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34,866 एवढी होती. यानंतर मे महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखच्याही पुढे गेला आहे. अर्थात गेल्या केवळ 27 दिवसांतच तब्बल 1,16,901 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

देशात 06 मे 2020 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 53,007 एवढी होती. हा आकडा जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीतील आहे. यानंतरचे जवळपास 50 हजार रुग्ण केवळ 12 दिवसांत वाढले आहेत. अर्था 18 मे 2020 रोजी देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,00,326 वर पोहोचला होता. मात्र, यानंतर चे 50 हजार नवे कोरोनाबाधित केवळ 10 दिवसांत समोर आले आहेत. आज 27 मे 2020च्या सकाळपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,51,767 वर पोहोचला आहे.

यामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन? वैज्ञानिक म्हणतात... 

24 तासांत 170 जणांचा मृत्यू -गेल्या 24 तासांत 6,387 नवे कोरोनाबाधित समोर आले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 64 हजार 425 जण कोरोनापासून मुक्त झाले आहेत. तर 83 हजार हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4,337 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. येथे आतापर्यंत 1,792 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

टॉप 10 देशांमध्ये भारत - भारतातील कोरोननाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता भारत कोरोना संक्रमित टॉप 10 देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारताच्या पुढे आता अमेरिका (1,725,275), ब्राझील (394,507), रशिया (362,342), स्पेन (283,339), इंग्लंड (265,227), इटली (230,555), फ्रान्स (182,722), जर्मनी (181,288) आणि तुर्की (158,762) यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्ली