CoronaVirus Marathi News corona patient dead bodies last rites video viral | CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

बंगळुरू - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या ही पाच लाखांच्या वर गेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. मृतदेहांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एकाच खड्ड्यात तब्बल 8 कोरोनाबाधितांचे मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोनाग्रस्तांचे मृतदेह खड्ड्यात फेकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे. जेडीएसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सावध राहा असं म्हटलं आहे.

'जर तुमच्या घरातल्या कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भाजपा सरकार कर्नाटकमध्ये असे मृतदेह फेकून देत आहेत' असं म्हणत जेडीएसने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये PPE किट घातलेले कर्मचारी उभ्या असलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढतात. त्यानंतर एका मागोमाग एक मृतदेह एका मोठ्या खड्ड्यात टाकतात. या व्हिडीओवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच चौकशीची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून एका दिव्यांग महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Video - संतापजनक! मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून कार्यालयातील दिव्यांग महिलेला बेदम मारहाण

'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं

CoronaVirus News : जीवघेणा ठरला विवाह सोहळा; नवरदेवाचा मृत्यू अन् तब्बल 95 वराती मंडळी कोरोना पॉझिटिव्ह

मोदी सरकारचा चीनला दणका! भारतात बंदी घातल्यानंतर TikTok म्हणतं...

...अन् चिमुकल्याच्या मृतदेहाला कवटाळत पित्याचा आक्रोश, मन सुन्न करणारी घटना

विशाखापट्टणम पुन्हा हादरलं! वायू गळतीमुळे दोन जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

 

English summary :
CoronaVirus Marathi News corona patient dead bodies last rites video viral

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News corona patient dead bodies last rites video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.