शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 8:50 AM

China Coronavirus :

ठळक मुद्देभाजपाच्या मित्रपक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'काँग्रेसच्या सदस्यांनी बेनीवाल यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र आक्षेप घेतला.

नवी दिल्ली  - चीनमधील वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 80 देशांत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे इटलीहून भारतात परतले आहेत. त्यावेळी राहुल यांनी कोरोनाची चाचणी केलीय का? असा सवाल भाजपाच्या एका खासदारांनी केला होता. त्यानंतर आणखी एका खासदाराने देखील असंच म्हटलं आहे. 

भाजपाच्या मित्रपक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.  सोनिया, राहुल, प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा असं बेनीयाल यांनी म्हटलं आहे. गुरुवारी (5 मार्च) लोकसभेत त्यांनी हे विधान केलं. विधानानंतर लोकसभेत गदारोळ झाला.  'भारतातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण इटालियन असून गांधी कुटुंबियांच्या घरात कोरोना असावा. त्यामुळे सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी हे कोरोनाने पीडित तर नाहीत ना, याची तपासणी व्हावी' असं हनुमान बेनीवाल यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेसच्या सदस्यांनी बेनीवाल यांच्या वादग्रस्त विधानावर तीव्र आक्षेप घेतला. पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी बेनीवाल यांचे वादग्रस्त वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर उद्भवलेल्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाजही तहकूब केले. तसेच काँग्रेसच्या सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. 'दिल्ली दंगलीमध्ये 53 जणांनी आपला जीव का गमावला याचा पंतप्रधान मोदी यांना जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षांविरुद्ध भाजपाने 'गोली मारो, गाली दो' मोहीम उघडली आहे. मोदींना गांधी आणि नेहरू कुटुंबीयांविरुद्ध फोबिया झाला आहे. त्याचे प्रतिबिंब बेनीवाल यांच्यासारख्या मानसिक संतुलन गमावलेल्यांच्या वक्तव्यांमधून उमटत असते' अशी टीका केली आहे.

इटलीहून परत आल्यावर राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी बुधवारी (5 मार्च) म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे. राहुल गांधी इटलीहून परतले आहेत. आता विमानतळावर त्यांनी कोरोनाची तपासणी केलीय की नाही?, नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी तरी राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी करायला हवी होती. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं म्हणत बिधुरी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द

एकही मंत्री कामाचा नाही, हे तर भ्रष्ट सरकार; काँग्रेस आमदाराचा राजीनामा

महाविकास आघाडी सरकारच्या विविध मंत्र्यांनी १०० दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

राज्याचा विकासदर घटला, बेरोेजगारीत दीड लाखांची वाढ

 

टॅग्स :corona virusकोरोनाcongressकाँग्रेसBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी