शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 5:34 PM

मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते.

बेंगलोरमध्ये ते सत्तेवर आल्यानंतर, एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला. यासंदर्भात त्यांनी काय विधान केले? म्हणाले, गॅस सिलिंडर फुटले, अरे! तुमचं डोकं फुटलं आहे की, गॅसचं सिलिंडर? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर थेट हल्ला चढवला. ते रविवारी कर्नाटकातील सिर्सी येथे एका प्रचारसभेत बोलत होते. 

मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते. आपल्याला आठवतच असेल की, दिल्लीत अशी घटना घडली होती, तेव्हा, दहशतवाद्याला का मारले गेले, म्हणून काँग्रेसच्या एक नेत्याच्या डोळ्यात पाणी आले होते."

"मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झालेला नाही. इश्वराने मोदीला केवळ तुमच्या सेवेसाठी जन्माला घातले आहे आणि आपले स्वप्न हे मोदीचा संकल्प आहे. ही तुम्हाला माझी गॅरंटी आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमच्या मुलांच्या भविष्याच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी, माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावे, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो की, 24/7 आणि 2047 पर्यंत देशाची सेवा," असेही मोदी म्हणाले.प्रभू श्रीरामांसाठी 500 वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला - राम मंदिराचा संदर्भ देत मोदी म्हणाले, "माझे आणि आपले पूर्वज अयोध्येत प्रभू रामचंद्रांसाठी 500 वर्षं लढत होते. हा काही कमी कालावधी नाही. यात लाखो लोक मारले गेले. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. असे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते. तरच 500 वर्षांचे स्वप्न आणि 500 वर्षांची प्रतीक्षा संपते. मात्र, हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपल्या मतांची ताकद मिळते."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस