Join us  

aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 3:06 PM

1 / 10
'भाबीजी घर पर हैं' या लोकप्रिय टीव्ही शोमधून अभिनेत्री सौम्या टंडनला घराघरात ओळख मिळाली आहे. सौम्या या शोमध्ये गोरी मॅमच्या भूमिकेत दिसली होती.
2 / 10
सौम्याची ही भूमिका चाहत्यांना इतकी आवडली की शो सोडल्यानंतरही लोक तिला गोरी मॅम या नावानेच ओळखतात. तिची ही भूमिका सर्वांच्याच विशेष लक्षात राहिली आहे.
3 / 10
अभिनेत्री सौम्या टंडन सध्या त्रासात आहे. ती आजारी असून प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4 / 10
सौम्याने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवरचे काही फोटो शेअर केले आहेत. सौम्याच्या हातावर ड्रिप असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
5 / 10
अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 'फोटो नेहमीच सुंदर नसतात आणि आयुष्य नेहमीच हसत नसतं' असं तिने म्हटलं आहे.
6 / 10
'माझी प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच मी फिट होऊन परत येईन. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद' असंही सौम्याने म्हटलं आहे.
7 / 10
सौम्या टंडनला नेमकं काय झालं हे अद्याप माहीत नाही, परंतु अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना तिची खूप काळजी वाटत आहे. ते चिंतेत आहेत.
8 / 10
सौम्या टंडनने टीव्ही शोशिवाय चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने 'जब वी मेट' आणि 'वेलकम टू पंजाब' मध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच फोटो शेअर करत असते.
9 / 10
10 / 10
टॅग्स :सौम्या टंडनहॉस्पिटल