Join us  

"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

गौतम गंभीरने विराटसाठी बॅटिंग करत त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 3:58 PM

Open in App

Gautam Gambhir On Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघातील दोन मोठे चेहरे गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. अनेकदा हे दिग्गज विविध कारणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आमनेसामने आले आहेत. पण, सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या हंगामात काहीसे वेगळे पाहायला मिळाले. मागील वर्षी एकमेकांना भिडणारे विराट आणि गंभीर यावेळी एकत्र दिसले. गळाभेट घेऊन त्यांनी चाहत्यांनाही सरप्राईज दिले आणि किंग कोहलीच्या भाषेत अनेकांचा मसाला बंद केला. नेटकरी, मीम्स बनवणाऱ्या अनेकांचा मसाला बंद झाला असल्याचे विराटने म्हटले होते. अशातच आता गौतम गंभीरने विराटसाठी बॅटिंग करत त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. 

आयपीएलच्या सतराव्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट आताच्या घडीला अव्वल स्थानी आहे. त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप असली तरी चाहते खराब स्ट्राईक रेटमुळे लक्ष्य करत आहे. विराटची संथ खेळी आरसीबीच्या पराभवाला कारणीभूत ठरते असे अनेकांनी म्हटले. याचाच दाखला देत गंभीरने टीकाकारांना प्रत्युत्तर देत विराटची बाजू मांडली. तो म्हणाला की, काहीही झाले तरी संघाचा विजय हा महत्त्वाचा असतो. जर तुम्ही १०० ज्या स्ट्राईक रेटने धावा करत असाल आणि संघ जिंकत असेल तर काहीच समस्या नाही. पण, तुम्ही १९० च्या स्ट्राईक रेटने धावा करून देखील संघाला विजय मिळत नसेल तर ही एक मोठी समस्या आहे. असे झाल्यास तुमच्या खेळीला काहीच अर्थ नाही. परंतु, ट्वेंटी-२० क्रिकटमध्ये वेन्यू, प्रतिस्पर्धी संघ आणि सामन्यातील परिस्थिती देखील महत्त्वाची असते. 

गौतम गंभीरची 'विराट' बॅटिंगएकूणच स्ट्राईक रेट कसाही असला तरी त्याचे संघाच्या विजयात किती योगदान असते हे महत्त्वाचे असल्याचे गंभीरने म्हटले. तो 'स्पोर्ट्सकीडा'शी बोलत होता. तसेच विराटने आमच्यामध्ये झालेल्या गळाभेटीवर भाष्य करताना काही मिश्किल टिप्पणी केली. तो योग्य बोलला आहे. आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि अनेकांचा मसाला बंद झाला. आम्हा दोघांमध्ये काय नाते आहे त्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नाही. त्यांना फक्त प्रसिद्धी हवी असते आणि टीआरपीसाठी आमच्याबद्दल प्रतिक्रिया देणे गरजेचे असते. विराट अप्रतिम खेळाडू असून मला त्याच्याकडून एक गोष्ट शिकायला आवडेल. ती म्हणजे डान्स... तो खूप भारी डान्स करतो याचे सर्वजण साक्षीदार आहेत, असेही गौतम गंभीरने सांगितले. 

टॅग्स :गौतम गंभीरविराट कोहलीआयपीएल २०२४भारतीय क्रिकेट संघ