शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Coronavirus: कोरोनाच्या लढ्यासाठी राज्यांना मोठं पॅकेज; मोदी सरकारनं दिले १५ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 8:45 PM

केंद्र सरकारनं इंडिया Covid19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे.

नवी दिल्लीः कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी दिला आहे. कोरोना इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम पॅकेजअंतर्गत थोडा थोडका नव्हे, तर तब्बल १५ हजार कोटींचा निधी मोदी सरकारनं राज्यांमध्ये वितरीत केला आहे. राज्य आरोग्य यंत्रणा सुधारणाच्या उद्देशाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हा संपूर्ण निधी देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी केंद्र सरकारनं इंडिया Covid19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधील खर्चासाठीची संपूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.सरकारने दिलेल्या पॅकेजशी संबंधित 5 महत्त्वाच्या गोष्टी(I) राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक वंदना गुरुनानी यांनी एक परिपत्रक जारी केले आहे की, जानेवारी २०२० ते मार्च २०२४ या कालावधीत शंभर टक्के केंद्रीय प्रकल्प टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे.(II) या प्रकल्पांतर्गत कोरोनाबाधित लोकांमधल्या विषाणूला रोखून राष्ट्रीय व राज्यस्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट केली जाणार आहे. यात वैद्यकीय उपकरणे, औषधे, इमारत प्रयोगशाळेची खरेदी आणि जैव-सुरक्षा सज्जता याला मजबूत करणे देखील समाविष्ट आहे. (III) हे परिपत्रक देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसह आरोग्य आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. ज्यात निधी त्वरित मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. (IV) पहिल्या टप्प्यात राबविल्या जाणार्‍या गोष्टींमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालय वाढविणे आणि इतर रुग्णालये विकसित करणे. तसेच वेगळ्या खोल्या, व्हेंटिलेटरसह आयसीयू, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयांमधील लॅब दुरुस्त करणं इत्यादींचा समावेश आहे. (V) पहिल्या टप्प्यात लॅब व रुग्णवाहिकांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. अहवालानुसार, केंद्रीय पॅकेज राज्यातील सुरक्षा उपकरणे (पीपीई), एन 95 मास्क आणि व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी दिलं जाणार आहे. ज्याचा भारत सरकारकडून खरेदी व पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या