शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

coronavirus: देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 5:08 AM

Corona vaccine Update : बिहारमधील लोकांना कोरोनाची लस मोफत देणार असे आश्वासन विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपने दिल्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

नवी दिल्ली - केवळ बिहारमध्येच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत देण्यात येणार आहे, असे केंद्रीय पशुविकास खात्याचे राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितले. बिहारमधील लोकांना कोरोनाची लस मोफत देणार असे आश्वासन विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपने दिल्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. कोरोना साथीच्या कारणाचा वापर भाजप राजकीय स्वार्थासाठी करत आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. यासंदर्भात ओदिशाचे अन्नपुरवठा मंत्री आर. पी. स्वैन यांनी विचारलेल्या सवालाला प्रताप सारंगी यांनी रविवारी उत्तर दिले.नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा तामिळनाडू, मध्य प्रदेश, आसाम, पुडुचेरी यांनी याआधीच केली आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोना लस मोफत द्या अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. प्रताप सारंगी हे ओदिशाच्या बालासोर भागातील राजकीय नेते आहेत. ओदिशाच्या नागरिकांना कोरोना लस मोफत मिळायला हवी. पण या विषयावर ओदिशातील लोकप्रतिनिधी असलेले केंद्रीय मंत्री काहीही बोलायला तयार नाहीत असेही त्या राज्याचे मंत्री  आर. पी. स्वैन म्हणाले होते.महिनाभरात दुसऱ्यांदा नवे रुग्ण ५० हजारांखालीनवी दिल्ली : देशात दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या सोमवारी ५० हजारांहून कमी होती. या महिन्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. तर सोमवारी ४८० जण या संसर्गाने मरण पावले असून सुमारे १०८ दिवसांनी दररोजचा मृतांचा आकडा इतका घटला आहे. सोमवारी कोरोनाचे ४५,१४८ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ७९ लाखांवर तर बळींची संख्या १ लाख १९ हजारांपेक्षा अधिक झाली आहे.

ॲस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे तरुण, वृद्धांमध्ये उत्तम प्रतिकारशक्तीॲॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ संयुक्तपणे विकसित करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे वृद्ध व्यक्तींमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे मानवी चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज या लसीमुळे वृद्ध व्यक्तींमध्ये निर्माण झाल्या. या लसीच्या आतापर्यंत झालेल्या चाचण्यांत सहभागी असलेल्या १८ ते ५५ वर्षे वयोगटातील स्वयंसेवकांमध्येही कोरोना विषाणूशी लढण्यासाठी उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले.ॲॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असलेल्या या लसीसह आणखी काही आघाडीच्या औषध कंपन्यांच्या कोरोना लसविषयक प्रयोगांकडे साऱ्या जगाचे डोळे लागले आहेत.आता ९८० रुपयांत कोरोना चाचणीमुंबई : राज्यात सरकारी इस्पितळात कोरोनाची चाचणी मोफत आहे; खासगी प्रयोगशाळेतील चाचणीचेही दरही कमी झाले असून ९८० रुपयांत चाचणी होणार आहे. कोरोना चाचणीचे ४५०० वरुन ९८० रुपयांपर्यंत दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर ९८० रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी १४०० रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी १८०० रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य