CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:47 PM2021-06-23T13:47:13+5:302021-06-23T13:48:22+5:30

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. हे 40 रुग्ण 8 राज्यांत आढळून आले आहेत. (Delta Plus Variant)

CoronaVirus all you need to know about delta plus variant Delta Variant | CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव

CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव

Next

नवी दिल्ली - जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta Plus Variant ) सरकारची चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. हे 40 रुग्ण 8 राज्यांत आढळून आले आहेत. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकचा समावेश आहे. एवढेच नाही, तर डेल्टा+ हा व्हेरिएंट ऑफ कंसर्न अहे. यामुळे राज्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. जाणून घ्या, हा व्हेरिएन्ट नेमका कशामुळे आहे अत्यंत धोकाघातक आहे? का एवढा भयभीत करणारा आहे याचा फैलाव? (CoronaVirus all you need to know about delta plus variant Delta Variant)

सर्वप्रथम जाणून घेऊया, कुठल्या राज्यात किती रुग्ण? -
महाराष्ट्र- 21
मध्य प्रदेश- 6
केरळ- 3
तामिळनाडू- 3
कर्नाटक- 2
आंध्र प्रदेश- 1
पंजाब- 1
जम्मू- 1

CoronaVaccination : कोरोना लशीमुळे महिलांना मासिक पाळीची समस्या! 'या' रिपोर्टनं टेन्शन वाढवलं

वेगाने वाढतोय डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) प्रभाव - डब्ल्यूएचओ
जगात कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा या व्हायरसच्या इतर स्वरूपांच्या तुलनेत अधिक प्रभावी होत चालला आहे. कारण हा अत्यंत वेगाने पसरतो. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात समोर आला होता. मात्र, आता हा जगातील किमान 80 देशांमध्ये पसरला आहे. बी.1.617.2 डेल्टा व्हेरिएंट हा भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळून आला होता.

डेल्टा व्हेरिएंट सर्वात मोठा धोका - फाउची
व्हाइट हाऊसमधील मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे, की कोरोनाचा अत्यंत संक्रमक व्हेरिएंट ‘डेल्टा’ हा महामारीचा सफाया करण्याच्या प्रयत्नांसाठी सर्वात मोठा धोका आहे. अमेरिकेत आढळणाऱ्या नव्या कोरोना बाधितांत 20 टक्क्यांहून अधिक रुग्णांत डेल्टा व्हेरिएंट हाच संक्रमणाचे मुख्य कारण आहे. गेल्या दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत नव्या रुग्णांपैकी दहा टक्के रुग्णांत हा व्हेरिएंट आढळून आला होता, असेही ते म्हणाले.

Delta Plus : लहान मुलांसाठी किती घातक आहे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट, काय म्हणाले एक्सपर्ट?

...म्हणून अधिक भयभीत करणारा आहे डेल्टा प्लस व्हेरिएंटचा फैलाव?
केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हणण्यात आले आहे, की भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (आयएनएसएसीओजी)ने इशारा दिला होता, की डेल्टा प्लस व्हेरिएंट, हा ‘सध्या चिंताजनक व्हेरिएंट आहे. वेगाने प्रसार, फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला घट्ट चिकटणे आणि ‘मोनोक्लोनल अंटीबॉडी’ प्रतिक्रियेत संभाव्य कमतरता, अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.

नुकताच या देशांत सापडलाय हा व्हेरिएंट -
कोरोना व्हायरसचा ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट भारताशिवाय -

अमेरिका
इग्लंड
पोर्तुगाल
स्वित्झर्लंड
जपान
पोलंड
नेपाळ
चीन
आणि रशियात आढळून आला आहे. 

या व्हेरिएंटविरोधात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन प्रभावी आहे?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे  दोन्ही भारतीय लशी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. मात्र, ते कितपत आणि किती प्रमाणावर अँटीबॉडी तयार करू शकतात, यासंदर्भातील माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल. 
 

 

Read in English

Web Title: CoronaVirus all you need to know about delta plus variant Delta Variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.