सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:46 PM2021-06-23T14:46:36+5:302021-06-23T14:48:49+5:30

यावेळी शिंदे स्वतःच्याच स्तुतीत एवढे वाहत गेले, की कोरोना काळात मध्य प्रदेशात जी काही मदत करण्यात आली, ती एमपी सरकारने नाही, तर आपणच केली, असा इशाराच ते देत होते.

CoronaVirus 34 died in govt figure jyotiraditya scindia paid tribute to more than 150  | सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

Next

भोपाळ - मध्य प्रदेशात काँग्रेसचा हात सोडून भाजपत प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्यांनी एक अशी चूक केली आहे, ज्यामुळे ते चर्चेता विषय बनले आहेत. शिंदे सध्या अशोकनगरमध्ये दोन दिवसीय दौऱ्याव आहेत. त्यांनी येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 150 हून अधिक लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, सरकारी काकडेवारीनुसार, येथे केवळ 34 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  (CoronaVirus 34 died in govt figure jyotiraditya scindia paid tribute to more than 150)

अशोकनगरमध्ये शिंदे यांनी जनतेशीही संवाद साधला. यावेळी कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना ते म्हणाले, पहिला व्हायरस, जो मला झाला होता, तो अल्फा व्हायरस होता आणि जो दुसरा व्हायरस आहे, तो डेल्टा स्वरूपात आहे. ते म्हणाले, हा व्हायरस 8 पट वेगाने पसरतो.

भाजपा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली मोठी चूक; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

कोरोनावर माहिती देताना शिंदे म्हणाले, अल्फा व्हायरसचे थेंब खूप बारीक असतात (तज्ज्ञांच्या मते अल्फा व्हेरिएंटची थेंब जाड असतात). मात्र, दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्या वक्तव्यात सुधारणाही केली. यावेळी शिंदे स्वतःच्याच स्तुतीत एवढे वाहत गेले, की कोरोना काळात मध्य प्रदेशात जी काही मदत करण्यात आली, ती एमपी सरकारने नाही, तर आपणच केली, असा इशाराच ते देत होते.

शिंदे म्हणाले, ऑक्सिजनसाठी देशात टँकरची कमतरता होती. मी परदेशातून टँकर मागवले. मध्य प्रदेशात ऑक्सिजनचे उत्पादन नव्हते, मी ऑक्सिजन आणण्यासाठी हवाई दलाला फोन केला. एवढेच नाही, तर भारताने अमेरिकेकडून जी मोठ मोठी विमानं विकत घेतली, ज्यांत टँकर-ट्रक जातात, ते प्लेन्स मीच ग्वाल्हेर येथे बोलावले.

शिंदे म्हणाले टँकर्सची लांबी अधिक असल्याने आम्ही टायर पंक्चर करून ते प्लेनमध्ये घुसवले. (येथे शिंदे उंची ऐवजी लांबी म्हणाले). एवढ्यावरच शिंदे थांबले नाही, तर लोकांना जेव्हा इंजेक्शनची आवश्यकता होती, भारतात तर इंजेक्शन तयार होत नव्हते, यावेळी मी एका कंपनीला विनंती करून मध्य प्रदेशात दहा हजार इंजेक्शन मे महिन्यात, तर एक लाख इंजेक्शन एप्रिल महिन्यात द्यायला लावले.

झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

ते पुढे म्हणाले, मी ऑक्सिमीटर पाठवले, थर्मामीटर पाठवले, मी अशोकनगरात ऑक्सिजन प्लांट दिला. मी रुग्णवाहिका पाठवली. शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे, राजकीय वर्तुळात सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे.

 

Web Title: CoronaVirus 34 died in govt figure jyotiraditya scindia paid tribute to more than 150 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.