शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

Corona virus Vaccine : 'कोविशिल्ड' लस परिणामकारकच! आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 9:28 PM

लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर...

पुणे : कोविशिल्ड लसीच्या चाचणीमध्ये परिणामकारकेतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीमुळे स्वयंसेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शुन्य आहे. तसेच लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी झाली आहे, असे स्पष्ट करत आदर पुनावाला यांनी लसीच्या क्षमतेवर निर्माण झालेला संभ्रम दूर केला.

अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीने जाहीर केलेल्या निष्कर्षानंतर वाढीव चाचण्या घेणार का, या प्रश्नावर बोलताना पुनावाला म्हणाले, अतिरिक्त चाचण्यांची गरज नाही. लसीची परिणामकारकतेच्या पुरेशा चाचण्या झाल्या आहेत. संवादातील गोंधळामुळे लसींच्या परिणामकारकतेबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, भारतातील उत्पादनावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. काही महिन्यांनी १८ वर्ष वयोगटाखालील स्वयंसेवकांमध्ये लसीच्या चाचणीला सुरूवात केली जाईल.

लसीचे वितरण कुठे आणि कसे होणार याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. सर्वांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल, असा दर कळविण्यात आला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. उत्पादन सातत्याने सुरू असल्याने लस वितरणामध्ये विलंब होणार नाही. दोन आठवड्यांनी मान्यता मिळाल्यास त्यादृष्टीने वितरण व डोसच्या संख्येत वाढ केली जाईल. पंतप्रधानांना लसींबाबत आधीपासूनच खुप माहिती होती. त्यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटले. त्यामुळे फार माहिती त्यांना द्यावी लागली नाही. लसीचे वितरण, नियमन ही पुढील आव्हाने असतील. कमीत कमी वेळेत आतापर्यंत झालेल्या उत्पादनाची त्यांनी प्रशंसा केली. आम्ही उत्पादन वाढविण्यासाठी उभा केलेला तिसरा प्रकल्पही पंतप्रधानांनी पाहिला. या प्रकल्पामुळे वर्षभरात अब्जावधी डोस तयार होतील.---------कोविशिल्ड आणि कोव्होव्हॅक्स या दोन्ही लसींची साठवणुक व वाहतुक २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करता येईल. त्यादृष्टीने भारताकडे पुरेशा पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. तर -२० पर्यंत साठवणुकीसाठी खुप कमी तर -७० अंशासाठी काहीच सुविधा नाहीत. यावरूनच पुढील काही महिन्यांत येणाऱ्या लसींबाबत साठवणुकीचा अंदाज बांधता येईल. अ‍ॅस्ट्रॉझेनेका लसीच्या तुलनेत नोव्हावॅक्स लसीची प्रक्रिया सुमारे दोन महिने मागे आहे. कोविशिल्डनंतर या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या. तर कोडेजेनिक्सची पहिल्या टप्प्यातील चाचणी डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये सुरू होणार असल्याने या लसीला आणखी एक वर्ष लागेल.---------सिरम संस्थेच्या टीमशी चांगला संवाद झाला. आतापर्यंतची लस निर्मितीतील प्रगती आणि भविष्यातील उत्पादन क्षमतेवर त्यांनी सखोल माहिती दिली. उत्पादन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करता आली.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीhospitalहॉस्पिटल