शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination : ...तर कोरोनाच्या लसीचा प्रभाव होऊ शकतो कमी, एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 16:50 IST

Corona vaccination in India : काही कारणांमुळे कोरोनाच्या लसीकरणाचा प्रभाव कमी होऊ शकतो, अशी भीती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. (Corona vaccination ) काल दिवसभरात देशामध्ये २.७० लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या जगातील इतर भागांप्रमाणेच भारतामध्येही मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. मात्र काही कारणांमुळे कोरोनाच्या लसीकरणाचा प्रभाव कमी होऊ शकतो, अशी भीती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. (... so the effects of coronavirus vaccine may be less, warns AIIMS director  Dr R. Guleria)

गुलेरिया म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी दोन उपाय महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे औषध आणि औषध देण्याची वेळ. जर तुम्ही औषध लवकर दिले किंवा उशिरा दिले तर त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. अनेक औषधांना एकत्र करून दिल्यास अशा प्रकारामुळे रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.   

कोरोना रुग्णांना स्टेरॉइड देणे फायदेशीर असल्याचे रिकव्हरी ट्रायलमधून दिसून आले आहे. मात्र ऑक्सिजनची पातळी कमी होण्यापूर्वी स्टेरॉइड दिल्याच त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. तसेच वेळेआधीच स्टेरॉइड देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर अधिक असल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये भारतात कोरोनाच्या २ लाख ७३ हजार ८१० नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ व पोहोचली आहे. दर दिवसभरात १ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील मृतांचा एकूण आकडा १ लाख ७८ हजार ७६९ झाला आहे. सध्या देशभरात १९ लाख २९ हजार ३२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यIndiaभारत