Corona Dealth : दुर्दैवी! ना रुग्णवाहिका ना कोणाची मदत; भावडांनी बाईकवर दोरी बांधून नेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:11 PM2021-05-12T19:11:16+5:302021-05-12T19:15:17+5:30

Corona Dealth : मृत्यूनंतर कोणतंही वाहन उपलब्ध न झाल्यानं नातेवाईकांनी बाईकवर मृतदेह ठेवत दोरी बांधून घेऊन गेले.

Corona Dealth : Dead body tied with a rope in the motorcycle umaria | Corona Dealth : दुर्दैवी! ना रुग्णवाहिका ना कोणाची मदत; भावडांनी बाईकवर दोरी बांधून नेला मृतदेह

Corona Dealth : दुर्दैवी! ना रुग्णवाहिका ना कोणाची मदत; भावडांनी बाईकवर दोरी बांधून नेला मृतदेह

Next

कोरोनाकाळात माणुसकीला काळीमा फासत असलेल्या अनेक घटना समोर येत आहे. अनेकजण कोरोनाच्या कठीण काळात एकमेंकाना मदत करायची सोडून लोकांच्या अवस्थेचा फायदा घेत आहेत. अशीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील मानपूरमध्ये उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी तरूणाचा मृत्यू झाला.

मृत्यूनंतर कोणतंही वाहन उपलब्ध न झाल्यानं नातेवाईकांनी बाईकवर मृतदेह ठेवत दोरी बांधून घेऊन गेले. उमरिया जिल्हा मुख्यालयापासून ४५ किलोमीटर दूर मानपूर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. पतौर गावातील ३५ वर्षीय रहवासी  असलेल्या एका व्यक्तीला अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

त्यानंतर नातेवाईक या तरूणाला घेऊन मानपूर विकासखंडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले.  उपचार सुरू झाल्यानंतर काहीवेळातच या तरूणाचा मृत्य झाला.  ज्यावेळी रुग्णालयातून कोणतीही मदत मिळाली नाही. म्हणून मृतदेह मोटारसायकलवर बांधून नेण्याची वेळ आली. 

बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

उमरिया जिल्हाधिकारी  संजीव श्रीवास्तव यांनी मानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेतील मृत व्यक्तीचे उपचार सुरू करण्यात आले होते.  पण कोविड प्रोटोकॉल्सपासून बचावासाठी नातेवाईकांनी घाई  करत मृतदेह नेला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरच रुग्णवाहिका दाखल केली जाणार आहे. 
 

Web Title: Corona Dealth : Dead body tied with a rope in the motorcycle umaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.