शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:10 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठकीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Congress Mallikarjun Kharge: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ नागरिकांना प्राण गमवावे लागल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणात सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठे विधान केले आहे. आमच्यासाठी देश प्रथम येतो. धर्म, जात किंवा पक्ष नंतर आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच खरगे यांनी ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

जयपूरमधील संविधान वाचवा रॅली दरम्यान मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. आपण सर्वांनी देशासाठी एकता दाखवली पाहिजे. तसेच मोदी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थित राहायला हवे होते. या हल्ल्यानंतर सरकारने कोणतेही पाऊल उचलले तरी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय हितासाठी त्यांच्यासोबत उभा राहील, असेही काँग्रेस अध्यक्ष यावेळी म्हणाले.

"निष्पाप पर्यटक काश्मीर सुरक्षित आहे, काश्मीर आपले आहे, हे ऐकून देशाच्या कानाकोपऱ्यातून तिथे जातात. तिथे अशी एक वाईट घटना घडली ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. नंतर, रुग्णालयात असलेल्या ३-४ जणांचाही मृत्यू झाला. हे घडल्यानंतर, मी बंगळुरूहून पत्रकार परिषद घेतली आणि पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी असे सांगितले. कारण जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे. आमची अशी इच्छा होती की या बैठकीत पंतप्रधानांनी त्यांच्या योजनेबद्दल सांगावे आणि लोकांकडून सूचनाही घ्याव्यात. याशिवाय, आम्ही पक्षाची बैठकही बोलावली, ज्यामध्ये आम्ही सर्वजण सरकारसोबत असल्याचा निर्णय घेण्यात आला होता," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"आम्ही सरकारला असेही सांगितले की या कठीण काळात, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देऊ.  पण हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सर्व पक्षाचे लोक त्या बैठकीला गेले, पण पंतप्रधान मोदी आले नाहीत. हे लाजिरवाणे आहे. जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणुकीसाठी भाषणे देता आणि दिल्लीत येऊ शकत नाही. दिल्ली बिहारपासून लांब आहे का? तुम्ही मोठमोठ्या गोष्टी बोलता. माझ्याकडे ५६ इंचाची छाती आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी लढेन, मी घरात घुसेन. अरे बाबा, निदान जर तुम्ही त्या दिवशी बिहारच्या ऐवजी आमच्या बैठकीत आला असतात तर सर्वांना कळले असते की तुमचे नियोजन काय आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला आमच्याकडून कोणती मदत हवी आहे. सर्व पक्षाचे लोक मदत करायला तयार आहेत, तरीही तुम्ही तिथे लक्ष देण्याचा प्रयत्नही केला नाही. पंतप्रधान आणि भाजपचे हे वागणं आहे," असेही खरगे म्हणाले.

"पंतप्रधान मोदींनी महागाई आणि बेरोजगारी दिली. अशा लोकांनी देशाला कमकुवत केले आहे आणि आता ५६ इंचाची छाती आकुंचन पावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी म्हणाले होते की विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे गुजरातमध्ये रूपांतर करण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. जेव्हा जेव्हा काँग्रेस वाढते तेव्हा हे लोक तिला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण आपण दडपले जाणाऱ्यांमधील नाही," असं खरगेंनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस