शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या खासदाराला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, पत्रकार परिषदेमधून घेऊन गेले पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:19 IST

Congress MP Rakesh Rathore Arrested : गुरुवारी राकेश राठोड आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Congress MP Rakesh Rathore Arrested  :  उत्तर प्रदेशातील सीतापूरचे काँग्रेसखासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश राठोड यांच्यावर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, गुरुवारी राकेश राठोड आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. 

१७ जानेवारीला एका महिलेने खासदार राकेश राठोड यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याप्रकरणी काल उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायमूर्ती राजेश चौहान यांनी राकेश राठोड यांना दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.

खासदार राकेश राठोड हे आत्मसमर्पण करणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, खासदार राकेश राठोड गेल्या ४ वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने आणि राजकीय कारकिर्दीत मदत देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होते. तसेच, त्यांच्याकडून तिला सतत धमक्या दिल्या जात होत्या.

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोतवालीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडितेने कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावेही गोळा केले आहेत. याशिवाय, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही न्यायालयासमोर नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMember of parliamentखासदारcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारी