Congress list in two days; . Determine the candidate | काँग्रेसची यादी दोन दिवसांत; ५० उमेदवार निश्चित

काँग्रेसची यादी दोन दिवसांत; ५० उमेदवार निश्चित

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ५० जणांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक बुधावरी दिल्ली पार पडली. छाननी समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार के. सी. पाडवी, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार हुसैन दलवाई आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस १२५-१२५ जागा लढणार असून जागा वाटपाच्या सुत्रावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसची पहिली यादी येत्या २ दिवसात जाहीर होईल. यात ५० जणांचा समावेश राहील, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress list in two days; . Determine the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.