शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

"यामुळे संसदेत लपवले गेले सत्य"; 'ती' VIDEO क्लिप शेअर करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 7:03 PM

पंतप्रधान मोदी म्हणतात, ज्यांनी भारतीय बँकांमध्ये चोरी केली, मी त्यांना पकडून परत आणीन. तर मी सरकारला त्यांची नावे विचारली.

ठळक मुद्देआरबीआयने नीरव मोदी, मेहुल चोकसींसह भाजपाच्या ‘मित्रां’ची नावे बँक चोरांच्या यादीत टाकल्याचे गांधींनी म्हटले आहेराहुल गांधी यांनी देशातील मोठ्या 50 डिफॉल्टर्सची नावे सरकारला विचारली होतीराहुल गांधी यांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या काळात विचारला होता

नवी दिल्ली :काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. त्यांनी, एक व्हिडिओ शेअर करत सरकारने मोठ्या बँक डिफॉल्टर्सची नावे लपवल्याचा आरोप केला आहे. संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी, आता खुद्द रिझर्व बँकेनेच नीरव मोदी, मेहुल चोकसींसह भाजपाच्या मित्रांची नावे बँकेचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या यादीत टाकली असल्याचे म्हटले आहे. 

ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, 'मी संसदेत एक सरळ प्रश्न विचारला होता - मला देशातील 50 सर्वात मोठ्या बँक चोरांची नावे सांगा. अर्थमंत्र्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. आता आरबीआयने नीरव मोदी, मेहुल चोकसींसह भाजपाच्या ‘मित्रां’ची नावे बँक चोरांच्या यादीत टाकली आहेत. यामुळेच संसदेत हे सत्य लपवण्यात आले.

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

मार्च महिन्यात झालेल्या बजेट सत्रात राहुल गांधी यांनी लोकसभेत बँकिंग फ्रॉडचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी सरकारकडे देशातील सर्वात मोठ्या 50 डिफॉल्टर्सची माहिती मागितली होती. हा प्रश्न त्यांनी प्रश्नोत्तराच्या काळात केला होता. 'मी सरकारला अत्यंत सोपा प्रश्न विचारला. देशातील 50 डिफॉल्टर कोण आहेत. मला कसल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात, ज्यांनी भारतीय बँकांमध्ये चोरी केली, मी त्यांना पकडून परत आणीन. तर मी सरकारला त्यांची नावे विचारली. मला उत्तर मिळाले नाही,' असेही राहुल गांधी यांनी म्हटलो होते.

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

यासंदर्भात उत्तर देताना, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर म्हणाले होते, यात लपवण्याचा काही संबंधच नाही. याची माहिती देण्यात आली आहे. सीआयसीच्या वेबसाईटवर सर्व विलफुल डिफॉल्टर्सची नावे आहेत. 25 लाखहून अधिक सर्व जणांची माहिती दिली जाते. अनुराग ठाकुर यांच्या या उत्तरामुळे संसदेत जबरदस्त गदारोळ झाला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक