शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना काँग्रेसने विचारले दहा महत्त्वाचे प्रश्न, बिहारला खोटी आश्वासने का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 09:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर लगेच हल्ला करून त्यांना १० प्रश्नांची उत्तरे मागून तुम्ही खोटे बोलत आहात, असा आरोप केला. हा आरोप आणि प्रश्नांचा थेट संबंध हा भाजप-जनता दल (यु) सरकारच्या कामकाजाबद्दल तयार केलेल्या आरोपपत्राशी आहे.

काँग्रेसने मोदी यांना विचारले की, केंद्र सरकार बिहारला विशेष राज्याचा दर्जा का देत नाही, ऊजार्मंत्री आर. के. सिंह यांनी बिहारच्या या मागणीला फेटाळून का लावले, त्यांची ही भूमिका तुम्हालाही मान्य आहे का? पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला, पवन खेडा यांनी दुसरा प्रश्न विचारला की, गेल्या निवडणुकीत ५०० कोटी गुंतवणुकीतून भागलपूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा झाली होती त्याचे काय झाले? बिहारला खोटी आश्वासने का? २०१५ मध्ये कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? बक्सरच्या चौसात १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या १३०० मेगावॅट थर्मल पॉवर प्लांटचे पुढे काय झाले?

मनिहारी ते साहिदगंज पूल का? नाही? बनला? कारण त्याची घोषणा तर त्यांनी स्वत:च केली होती. चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा चार पदरी रस्ता का तयार झाला नाही? तुमची आश्वासने खोटी का? अशा अनेक आरोपांचे हे पत्र पक्षाने महागठबंधनकडून तयार करून घेतले आहे. ते प्रचारात मतदारांत वाटले जाईल म्हणजे त्यातून हे सिद्ध होईल की, मोदी खोटी आश्वासने देतात. 

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी