शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयुक्तांसाठी कॉलेजियम पद्धत

By admin | Updated: March 13, 2015 23:04 IST

निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांना समान घटनात्मक संरक्षण देण्यासह ही संस्था बळकट करण्यासाठी विधि आयोगाने विविध उपाययोजना

नवी दिल्ली : निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांना समान घटनात्मक संरक्षण देण्यासह ही संस्था बळकट करण्यासाठी विधि आयोगाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. आयोगाच्या तिन्ही सदस्यांना समान घटनात्मक संरक्षण, तसेच उच्चाधिकार कॉलेजियमकडून मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन आयुक्तांची नियुक्ती करण्याची शिफारसही विधि आयोगाने कायदा मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात केली आहे.निवडणूक आयोग हे स्थायी मंडळ असून देशाच्या राज्यघटनेनुसार त्याची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली आहे. या आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त हे एकमेव पद होते. १६ आॅक्टोबर १९८९ रोजी प्रथमच दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली. पण त्यांचा कार्यकाळ केवळ १ जानेवारी १९९० पर्यंतच राहिला. त्रिसदस्यीय आयोग अस्तित्वात आला. तेव्हापासून बहुमताने निर्णय घेण्याची प्रक्रियाही अवलंबण्यात आली. नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन आयुक्तांची नियुक्ती करतात. महाभियोग आणला, तरच मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविले जाऊ शकते. अन्य आयुक्तांना पदावरून हटवायचे झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलेली शिफारसही पुरेशी ठरते.(लोकमत न्यूज नेटवर्क)