शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:00 IST

नौदलाचं जहाज आयएनएस सुरतने आग लागलेल्या जहाजावरील १८ क्रू मेंबर्सना वाचवले आहे. काही क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत आणि त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे

केरळच्या किनारपट्टीनजीक सिंगापूरच्या मालवाहतूक जहाजाला लागलेली आग विझवण्याचं काम अद्याप सुरू आहे. भारतीय नौदलाचे आयएनएस सूरतने या जहाजावरील १८ सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे तर ४ क्रू मेंबर्स अजूनही बेपत्ता आहेत. या जहाजाला रविवारी आग लागली होती. मागील २ दिवसांपासून भारतीय नौदल, कोस्ट गार्डसह संयुक्त अभियानाद्वारे मोहिम हाती घेण्यात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलाची जहाजे सचेत आणि समुद्र प्रहारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तटरक्षक दलाचे डोर्नियर विमान बचाव कार्याचे हवाई सर्वेक्षण करत आहे. मंगळवारी तटरक्षक दलाचे जहाज समर्थ देखील बचाव कार्यात सामील झाले. सोमवारी केरळ किनाऱ्यापासून सुमारे ४४ नॉटिकल मैल अंतरावर सिंगापूरच्या एका मालवाहतूक जहाजाचा अपघात झाला. कोलंबोहून मुंबईला जाणारे सिंगापूरचा झेंडा असलेले जहाज एमव्ही वान है ५०३ अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे जहाजात मोठा स्फोट झाला.

या जहाजावर जवळपास ६५० कंटेनर आहेत, ज्यातील अनेक कंटेनर समुद्रात पडलेत. ज्या वेगाने ही आग भडकत आहे त्यामुळे जहाजातील कंटेनर्समध्ये एखादं ज्वलनशील रसायन असू शकतो असं म्हटलं जाते. सध्या जहाज कंपनी कंटेनर्स मालकांकडून त्यांनी ठेवलेल्या सामानाची माहिती मागवत आहे. नौदलाचं जहाज आयएनएस सुरतने आग लागलेल्या जहाजावरील १८ क्रू मेंबर्सना वाचवले आहे. काही क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत आणि त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. क्रू मेंबर्सना मंगळुरू बंदरात आणण्यात आले आहे. जखमींवर कुंतिकाना येथील एजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चीनी दूतावासाने भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचे मानले आभार 

जहाजाला लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल भारतातील चीनचे राजदूत यू जिंग यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'जहाजातील क्रूमध्ये २२ लोक होते, त्यापैकी १४ चिनी नागरिक आहेत. सहा लोक तैवानचे आहेत. आम्ही भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानतो. जखमी क्रू सदस्य लवकर बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, केरळ समुद्र किनाऱ्यावर तेल गळतीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सिंगापूरच्या जहाजाला भीषण आग लागल्यानंतर भारताच्या नॅशनल सेंटर फॉर ओसीन इंफोर्मेशन सर्व्हिस केंद्राने हा इशारा जारी केला आहे. जहाज अजूनही जळत आहे. नौदल आणि तटरक्षक दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :fireआगindian navyभारतीय नौदलchinaचीनIndiaभारत