शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या डान्सबार कायद्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By admin | Updated: August 31, 2016 04:09 IST

डान्सबारवरील बंदी उठविणाऱ्या न्यायालयीन निकालास बगल देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यास डान्सबार मालक आणि बारबालांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले

नवी दिल्ली : डान्सबारवरील बंदी उठविणाऱ्या न्यायालयीन निकालास बगल देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यास डान्सबार मालक आणि बारबालांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून याचिकाकर्त्यांच्या मुद्द्यांना राज्य सरकारने तीन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.डान्सबारना सरसकट बंदी करणे ही बारबालांच्या उपजीविकेच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली आहे, असा निर्वाळा देत न्यायालयाने सन २०१४ मध्ये डान्सबार बंदीचा त्यावेळचा कायदा रद्द केला होता. त्यानंतर नव्या याचिकांवर न्यायालयाने अटींची पूर्तता करणाऱ्या काही डान्सबारना लगेच परवाने देण्याचे आदेशही दिले होते. हे सुरु असतानाच विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात राज्य सरकारने ‘महाराष्ट्र प्रोहिबिशन आॅफ आॅब्सीन डान्स इन हॉटेल्स, रेस्टॉरन्ट््स अ‍ॅण्ड बार रूम्स अ‍ॅण्ड प्रोटेक्शन आॅफ डिग्निटी आॅफ विमेन (वर्किंग देअरइन) अ‍ॅक्ट’ हा नवा कायदा घाईघाईने मंजूर करून घेतला.मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्या. दीपक मिश्रा व न्या. सी. नागप्पन यांचे खंडपीठ एका टप्प्याला या कायद्यास अंतरिम स्थगिती देण्याच्या मनस्थितीत असल्याचे जाणवले. याआधीचा निकाल आम्ही राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ च्या (व्यवसाय स्वातंत्र्य) आधारे दिले होते. त्या निकालाचा आधार तुम्ही नवा कायदा करून कसा काय काढून घेऊ शकता?, असेही खंडपीठाने राज्य सरकारला विचारले. मात्र नंतर राज्य सरकारचे ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांची विनंती मान्य करून न्यायालय येत्या २१ सप्टेंबर रोजी सरकारचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेण्यास राजी झाले. त्यासाठी सरकारला औपचारिक नोटिसही काढण्यात आली.डान्सबार मालकांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नव्या कायद्यातील आक्षेपार्ह तरतुदींचा आढावा घेतला. डान्सबारमधील ग्राहकांनी बारबालांवर पैसे उधळण्यास घातलेल्या बंदीचा भूषण यांनी उल्लेख केला तेव्हा न्या. मिश्रा म्हणाले की, सकृद्दर्शनी यात आक्षेपार्ह वाटत नाही. पैसे उधळले जाण्यास बारबालांचा आक्षेप नसला तरी एकूणच असे कृत्य महिलांची अप्रतिष्ठा करणारे आहे.यावर भूषण म्हणाले की, एखाद्याचे गाणे आवडले तर श्रोते खुष होऊन त्याला पैसे देतात. ही कलेला दाद देण्याची एक पद्धत आहे. गायकाला पैसे देणे चालते, मग नर्तिकेस पैसे दिल्याने काय बिघडते?यासह विविध तरतुदींनाही भूषण यांनी आक्षेप घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)