शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भाडे गृह योजनेसाठी केंद्र करणार राज्यांशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 03:11 IST

केंद्रीय गृहनिर्माण सचिवांची माहिती

नवी दिल्ली : ‘किफायतशीर भाडे गृहसंकुल योजने’अंतर्गत (एआरएचसी) शहरांत राहणारे गरीब लोक आणि स्थलांतरित मजूर यांच्याकरिता किफायतशीर घरे बांधण्यासाठी केंद्र सरकार महिनाभरात राज्य सरकारांशी करार करणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी माध्यम प्रतिनिधींशी केलेल्या आॅनलाईन वार्तालाप कार्यक्रमात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत दिल्लीत सुमारे ३२ हजार फ्लॅट उपलब्ध आहेत, तसेच फरिदाबादेत सुमारे १ हजार निवासस्थाने उपलब्ध आहेत.

मिश्रा यांनी सांगितले की, सर्व राज्यांत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकार एक महिन्याच्या आत राज्य सरकारसोबत करारपत्रावर स्वाक्षºया करणार आहे. शासकीय निधीवरील फ्लॅटसोबतच रिकाम्या जागांवर या योजनेंतर्गत फ्लॅट बांधले जाऊ शकतात. तथापि, त्यासाठी राज्य सरकारांनी आपल्या बृहत आराखड्यात (मास्टर प्लॅन) यासंबंधीची ‘वापर परवानगी’ द्यायला हवी. एआरएचसी ही योजना ‘पंतप्रधान आवास योजना-शहरे’ या योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आहे. गरीब आणि स्थलांतरित मजुरांना किफायतशीर निवासस्थाने उपलब्ध करून देणे, हा योजनेचा उद्देश आहे.२0२२ पर्यंत एआरएचसीअंतर्गत घरांची बांधणी अथवा दुरुस्ती करण्याचे निश्चित उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी गेल्या महिन्यात देशव्यापी पातळीवर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सचिवांनी सांगितले की, योजनेत सहभागी होण्यासाठी इरादापत्रे (ईओआय) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आली आहेत. या घरांचे भाडे स्थानिक संस्थांकडून ठरविले जाणार आहे.मे महिन्यात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत स्थलांतरित कामगार वर्ग आणि शहरांतील गरीब वर्ग यांना भाडेपट्ट्यावर घरे दिली जाणार आहेत....................

टॅग्स :Homeघर