शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 2:18 PM

बांग्लादेशी खासदार अन्वारुल अनवर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

Bangladesh MP Anwarul Azim Anwar Death : बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अन्वर यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पश्चिम बंगाल सीआयडीने गुरुवारी सांगितले की, खासदार अन्वारुल यांच्या मित्रानेच हत्येसाठी 5 कोटी रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, अन्वारुल 13 मे रोजी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून अचानक बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी पोलिसांना त्यांची हत्या झाल्याचे समजले. 

बांग्लादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन यांनी बुधवारी(दि.22) आपल्या खासदाराच्या हत्येची माहिती दिली होती. सध्या पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. पश्चिम बंगाल सीआयडीचे आयजी अखिलेश चतुर्वेदी यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, ही एक सुनियोजित हत्या होती. अन्वारुल यांच्या अमेरिकेत राहणाऱ्या जुन्या मित्राने हत्येसाठी 5 कोटी रुपयांची सुपारी दिली. 

उपचारासाठी कोलकाता येथे आले खासदार अन्वारुल आपल्या वैद्यकीय उपचारासाठी कोलकाता येथे आले होते. ते आपले मित्र गोपाल बिस्वास यांच्या घरी थांबले. 13 मे रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेंट असल्याचे घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाही. सहा दिवसांनंतर, म्हणजेच 18 मे रोजी गोपाल यांनी अन्वारुल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान कोलकात्याच्या बाहेरील न्यू टाऊनमध्ये असलेल्या एका आलिशान फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. यावरुन खासदाराचा खुन झाल्याचा संशय पोलिसांना आला. आता तपासादरम्यान पोलिसांनी दावा केलाय की, हा खुन अन्वारुल यांच्या मित्राच्या सांगण्याने करण्यात आला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBangladeshबांगलादेश