शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

जबरदस्त राजकारण! भाजप, काँग्रेसचं तिकीट मिळवत बिनविरोध निवडून आला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 18:21 IST

तीन बड्या पक्षांकडून उमेदवारी मिळवत नेता बिनविरोध विजयी

प्रयागराज: उत्तर प्रदेशात सध्या ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या लढवत आहेत. मोठ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू आहे. काही उमेदवारांना पाठिंबाच न मिळाल्यानं त्यांना घरी बसावं लागलं. तर काहींनी इतरांचं गणित बिघडवण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवली.

प्रयागराजमधल्या एका नेत्याच्या बाबतीत मात्र अगदी उलटं झालं आहे. शैलेश यादव यांना एक दोन नव्हे, तर तीन-तीन मोठ्या पक्षांनी उमेदवारी दिली. त्यामुळे यादव बिनविरोध निवडून आले. आता तिन्ही पक्ष शैलेश यादव त्यांचेच उमेदवार असल्याचा दावा करत आहेत. विजयी उमेदवारांच्या यादीत शैलेश यांचं नाव असल्याचं म्हणत भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं आपला उमेदवार विजयी झाल्याचं म्हणत जल्लोष करत आहेत.

प्रतापपूर मतदारसंघात जबरदस्त राजकारणप्रतापपूर मतदासंघात शैलेश यादव बिनविरोध निवडून आले. यादव समाजवादी पक्षाचे नेते म्हणून परिसरात परिचित आहेत. बऱ्याच वर्षांपासून ते सपामध्ये सक्रिय आहेत. सपा जिल्हाध्यक्ष योगेश यादव यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांची घोषणा केली. त्यात सातव्या क्रमांकावर शैलेश यादव यांचं नाव होतं. त्यामुळे प्रतापपूर ब्लॉकमधून शैलेश यादव सपाचे अधिकृत उमेदवार होते.

आठ जुलैला सकाळी काँग्रेसनंदेखील शैलेश त्यांचे उमेदवार असल्याची घोषणा केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी त्यांच्या लेटरहेडच्या माध्यमातून याबद्दल घोषणा केली. सपानं त्यानंतर या जागेवर राधादेवींनी उमेदवारी दिली. तर ७ जुलैला भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रतापपूर ब्लॉकमधून भाजपनं सीमादेवी विश्वकर्मा यांना उमेदवारी दिली. ८ जुलैला भाजप जिल्हाध्यक्ष अश्विनी कुमार द्विवेदी यांनी सीमा यांचं तिकीट कापलं आणि शैलेश यादव यांना उमेदवारी दिली.

९ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. तिन्ही बड्या पक्षांनी उमेदवारी दिल्यानं यादव बिनविरोध निवडून आले. आता तिन्ही पक्ष विजयी उमेदवारांच्या यादीचा हवाला देत आपलाच विजय झाल्याचा दावा करत आहेत. निवडणुकीच्या राजकारणात बाजी मारत शैलेश यादव बाजीगर ठरले. तर त्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षांवर आता डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी