भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर; 20 जानेवारीला होणार नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:32 IST2026-01-16T13:32:12+5:302026-01-16T13:32:32+5:30

19 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार!

BJP presidential election date announced; Announcement on January 20 | भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर; 20 जानेवारीला होणार नावाची घोषणा

भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर; 20 जानेवारीला होणार नावाची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीने आपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

भाजपच्या केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. 

19 जानेवारी : उमेदवारी अर्ज दाखल

20 जानेवारी : नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा

नितीन नबीन प्रमुख दावेदार

सध्या भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन हेच या पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार उभा राहण्याची शक्यता कमी असल्याने त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नामांकन प्रक्रियेदरम्यान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह तसेच विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे प्रस्तावक म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीला मुख्यमंत्र्यांसह पक्षनेतृत्व पाचारण

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेचे सदस्य यांना दिल्ली येथे पाचारण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिक नसून, पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष?

46 वर्षीय नितीन नबीन यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास ते भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरतील. जे.पी. नड्डा यांच्या दीर्घ कार्यकाळानंतर होणारा हा बदल पक्षात नव्या नेतृत्वाचा आणि रणनीतीतील बदलाचा संकेत मानला जात आहे.

तीन वर्षांचा कार्यकाळ, 2029 खरी कसोटी

डिसेंबर 2025 मध्ये कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितीन नबीन यांनी संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. विशेषतः बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी ही त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.

Web Title : भाजपा अध्यक्ष चुनाव की तारीख घोषित; 20 जनवरी को नाम की घोषणा

Web Summary : भाजपा ने 20 जनवरी, 2026 को होने वाले अध्यक्ष चुनाव की घोषणा की। नितिन नबीन निर्विरोध चुने जा सकते हैं। प्रक्रिया 19 जनवरी से शुरू होगी। वर्तमान कार्यकारी अध्यक्ष नबीन प्रबल दावेदार हैं। 2029 के चुनाव में उनके नेतृत्व की सबसे बड़ी परीक्षा होगी।

Web Title : BJP President Election Date Announced; Name Declaration on January 20

Web Summary : BJP announced its presidential election for January 20, 2026. Nitin Nabin is likely to be elected unopposed. The process starts January 19. Nabin, currently the working president, is the frontrunner. His leadership faces its biggest test in the 2029 elections.