केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:01 IST2026-05-04T15:00:35+5:302026-05-04T15:01:22+5:30

Keralam Assembly Election Result 2026 : एकीकडे राज्यात काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू असताना दुसरीकडे केरळममध्ये अद्याप किरकोळ अस्तित्व भाजपानेही आपल्या कामगिरीत सुधारणा करत खातं उघडलं आहे.

BJP opens account in Kerala, lotus blooms in 'Ya' constituency, defeats Congress, CPI candidates | केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात

केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात

केरळम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने दणदणीत विजय मिळवत दहा वर्षांनंतर राज्याच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. मतमोजणीच्या समोर आलेल्या आतापर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. एकीकडे राज्यात काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू असताना दुसरीकडे केरळममध्ये अद्याप किरकोळ अस्तित्व भाजपानेही आपल्या कामगिरीत सुधारणा करत खातं उघडलं आहे. राज्यातील चथन्नूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी.बी. गोपाकुमार हे विजयी झाले आहेत. गोपाकुमार यांनी ४०१२ मतांनी विजय मिळवला आहे.

केरळमधील चथन्नूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बी.बी. गोपाकुमार, सीपीआयचे आर. राजेंद्रन आणि काँग्रेसचे सूरज रवी अशी तिरंगी लढत रंगली होती. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत बी. बी. गोपाकुमार यांनी ४०१२ मतांनी विजय मिळवत पक्षाला राज्यात खाते उघडून दिले. दरम्यान, या मतदारसंघातील मतमोजणी सीपीआयचे आर. राजेंद्रन हे दुसऱ्या, तर सूरज रवी हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केरळमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे चथन्नूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मिळालेलं यश हे पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने मोठं मानलं जात आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील १४० जागांपैकी १०४ जागांवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने आघाडी मिळवली आहे. तर डाव्या पक्षांना ३४ जागांवर आघाडी मिळाली आहे. 
 

Web Title : केरल में भाजपा का खाता खुला; चथनूर में खिला कमल!

Web Summary : केरल में यूडीएफ जीता, पर भाजपा ने खाता खोला। बी.बी. गोपाकुमार ने चथनूर में सीपीआई और कांग्रेस उम्मीदवारों को हराया। भाजपा को मिली बढ़त।

Web Title : BJP Opens Account in Kerala; Lotus Blooms in Chathannoor!

Web Summary : UDF won Kerala, but BJP opened its account. B.B. Gopakumar won Chathannoor, defeating CPI and Congress candidates. BJP gains foothold.