शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

BJP New President: भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'ही' तीन नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:09 IST

BJP National President: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असून प्रथमच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एका महिलेची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निर्मला सीतारामन, वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कोणत्या नेत्याच्या खांद्यावर सोपवली जाईल, हे लवकरच स्पष्ट होईल.  भाजप नेते जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपला. परंतु, पक्षाने त्यांना जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. आता पुढील काही दिवसांत नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला सितारामन यांच्यासह तीन प्रमुख महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

निर्मला सीतारमणदेशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शर्यतीत आघाडीवर मानल्या जात आहेत. अलिकडेच त्यांनी भाजप मुख्यालयात जेपी नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांच्याशी बैठक घेतली. दक्षिण भारतातून येणे भाजपच्या दक्षिण विस्तार धोरणासाठी फायदेशीर मानले जाते.

डी. पुरंदेश्वरीआंध्र प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष डी पुरंदेश्वरी या एक अतिशय अनुभवी आणि बहुभाषिक नेत्या आहेत. त्यांना अनेक राजकीय पक्षांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांना ऑपरेशन सिंदूर सारख्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमांचाही भाग बनवण्यात आले होते.

वनथी श्रीनिवासनतामिळनाडूच्या कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा वनथी श्रीनिवासन १९९३ पासून भाजपसोबत काम करत आहेत. त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. २०२२ मध्ये त्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या आणि असे करणाऱ्या पहिल्या तमिळ महिला नेत्या ठरल्या.

टॅग्स :BJPभाजपाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPoliticsराजकारण