'लंका की लंकिनी जैसी हैं....', ममता बॅनर्जींना भाजपा आमदार म्हणाला 'राक्षस'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 11:39 AM2020-01-15T11:39:25+5:302020-01-15T11:41:25+5:30

'भाजपा हा देवतांचा पक्ष आहे'

bjp mla surendra singh controversial statement on mamata banerjee in ballia | 'लंका की लंकिनी जैसी हैं....', ममता बॅनर्जींना भाजपा आमदार म्हणाला 'राक्षस'

'लंका की लंकिनी जैसी हैं....', ममता बॅनर्जींना भाजपा आमदार म्हणाला 'राक्षस'

Next

बलिया : उत्तर प्रदेशमधीलभाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 

सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर राक्षसी संस्कार असल्याचे वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. ते म्हणाले, "बंगालमध्ये ममता नेत्या नाहीत, तर लंकेच्या लंकिनीसारख्या आहेत."

सुरेंद्र सिंह म्हणाले, "आधी राक्षसांची परंपरा होती. ती परंपरा संपली असून आता ती दिसत नाही. मात्र माणसाच्या रुपात राक्षस जीवंत आहेत. ममता बॅनर्जी राक्षसी परंपरेच्या आहेत. जसे की लंकेत लंकिनी होत्या, त्या हनुमानला रोखत होत्या. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या हनुमानला रोखण्याची क्षमता कोणामध्ये नाही आहे. तसेच, नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी बंगाल फत्ते केले तर लंकिनीचा नाश होईल आणि विभीषणाचे राज्य स्थापित होईल. भाजपा विभीषणाच्या शोधात आहे."

याचबरोबर, भाजपा हा देवतांचा पक्ष आहे. तर, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तेलुगू देसम पक्ष हे राक्षसांचे पक्ष आहेत. दहशतवाद्यांना संरक्षण देणे म्हणजे राक्षसांना संरक्षण देण्यासारखे आहे,' असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधल्या बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघाचे आमदार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या 

CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त

अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा

सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा

शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ

Web Title: bjp mla surendra singh controversial statement on mamata banerjee in ballia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.