शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराची पोलीस ठाण्यात गुंडगिरी, तरुणीची छेड काढणाऱ्या आरोपीला नेले सोडवून

By बाळकृष्ण परब | Updated: October 17, 2020 15:06 IST

BJP MLA News : थेट पोलीस ठाण्यात घुसून गुंडगिरी करणाऱ्या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीला आपल्यासोबत सोडवून नेले

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील मोहम्मदी पोलीस ठाण्यात काल रात्री भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गोंधळपोलीस ठाण्यात घुसून गुंडगिरी करणाऱ्या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीला आपल्यासोबत सोडवून नेलेमोहम्मदी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली होती

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) -गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी त्यांचे स्वपक्षीय आमदार डोकेदुखी ठरत आहेत. बलिया येथील गोळीबारकांडातील आरोपीचा आमदार सुरेंद्र सिंह यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता अजून एका आमदाराने योगी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यातील मोहम्मदी पोलीस ठाण्यात काल रात्री भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गोंधळ घातला. थेट पोलीस ठाण्यात घुसून गुंडगिरी करणाऱ्या आमदारांनी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीला आपल्यासोबत सोडवून नेले.मोहम्मदी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर संतप्त झाले. तसेच आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्रभर गोंधळ घातला.या दरम्यान, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केले आणि पकडण्यात आलेल्या आरोपीला सोडवून आपल्यासोबत नेले. आता या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.दरम्यान, भाजपा आमदार लोकेंद्र बहादूर यांनी दबंगगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. काही दिवसांपूर्वी लोकेंद्र बहादूर यांनी धान खरेदी केंद्रात जाऊन गोंधळ घातला होता. तसेच सरकारी धान खरेदी केंद्रात असलेले रजिस्टर फेकून दिले होते. तसेच धान खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांना शिविगाळही केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाMLAआमदारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस