शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या मंत्र्यांनी नाेएडा म्हणून बीजिंग विमानतळाचे फाेटाे केले शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 06:27 IST

Politics News: पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उत्तर प्रदेशात जेवर येथे नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. आशियातील हे सर्वात माेठे विमानतळ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उत्तर प्रदेशात जेवर येथे नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. आशियातील हे सर्वात माेठे विमानतळ असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या विमानतळाचे काही संभाव्य फाेटाे भाजपचे मंत्री आणि नेत्यांकडून शेअर करण्यात आले. ते फाेटाे चक्क चीनमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे असून, या प्रकारावरून जाेरदार टीका करण्यात येत आहे.

भाजपचे नेते, मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद माैर्य यांनीही ट्विटरवरून नाेएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा संदर्भ देऊन फाेटाे शेअर केले आहेत. मात्र,  हे फाेटाे बीजिंगच्या दॅक्सिन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. चीनचे पत्रकार शेन शिवेई यांनीही हाच दावा केला आहे.

पायाभरणी समारंभातही बीजिंगच्या विमानतळाचेच फाेटाे वापरल्याबाबत शिवेई यांनी ट्विट केले आहे. भारतातील अधिकाऱ्याची अशी कृती अतिशय धक्कादायक असल्याचे शिवेई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काही फॅक्टचेक करणाऱ्या वेबसाईट्सनी देखील हा फाेटाे दॅक्सिन विमानतळाचाच असल्याचे म्हटले आहे. 

काँग्रेसने केली टीका- शिवेई याच्या ट्वीटचा स्क्रीनशाॅट शेअर करून काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे. ही किती लाजिरवाणी गाेष्ट आहे. - मंत्र्यांना किती ज्ञान आहे, हे आपण जाणताेच. पण मायगव्हहिंदी या सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरूनही हेच फाेटाे शेअर करण्यात आले आहेत, असे ट्वीट किर्ती आझाद यांनी केले आहे.

टॅग्स :AirportविमानतळBJPभाजपाcongressकाँग्रेस