शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या, पंतप्रधान मोदींनी केला फोन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 10:41 IST

जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवादी आणि भारतीय सैन्यांमध्ये सातत्यानेच चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रीनगर - काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री एका भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी जिल्हाध्यक्ष वसिम बारी यांना ठार करत, त्यांच्या कुटुंबीयांवरही गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात वसीम यांच्यासह त्यांचे भाऊ आणि वडिल यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन बारी कुटुंबींये सांत्वन केले. 

जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवादी आणि भारतीय सैन्यांमध्ये सातत्यानेच चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी दहशतवाद्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील भाजपा नेते वसिम बारी यांच्या कुटुंबावर हल्ला करत तिघांना ठार केले. हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून या दहशतवाद्यांनी धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच, वसिमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 8 पीएसओंना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे. 

भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी याप्रकरणी ट्विट करुन माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारी कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन केले. तसेच, घटनेची चौकशीही केल्याचे सिंह यानी सांगितले. तसेच, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बंदीपोराचे जिल्हाध्यक्ष वसीम बारी यांचा मृत्यू झाला असून त्यांचे वडिल आणि भाऊ हेही ठार झाल्याचे सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही वसिम यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केला आहे. आम्ही बंदोपोरा येथे शेख वसीम बारी, त्यांचे भाऊ आणि वडिल यांना गमावलं आहे. पक्षाचं हे मोठं नुकसान असून संपूर्ण भाजपा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत या दु:खात सहभागी आहे. वसिम यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही नड्डा यानी ट्विटरवरुन म्हटले आहे.  नॅशनल कॉन्फेरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या दहशतावादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच, शेख वसिम यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचेही म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMurderखूनTerrorismदहशतवादNarendra Modiनरेंद्र मोदी