शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख जण देणार सेल्फी व्हिडिओद्वारे शुभेच्छा!, नरेंद्र मोदींच्या वाढदिवसासाठी भाजप आयटी विभागाची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:37 IST

भाजपच्या आयटी विभागाने या उपक्रमाची आखणी केली आहे. त्यासाठी ‘हॅपी बर्थडे मोदीजी’ हा हॅशटॅग तयार केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७० वा वाढदिवस असून, त्यादिवशी त्यांना किमान दहा लाख लोकांनी सेल्फी व्हिडिओ चित्रित करून शुभेच्छा द्याव्यात यासाठी भाजपने मोहीम हाती घेतली आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार तसेच स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे.भाजपच्या आयटी विभागाने या उपक्रमाची आखणी केली आहे. त्यासाठी ‘हॅपी बर्थडे मोदीजी’ हा हॅशटॅग तयार केला आहे. केवळ नागरिकांनीच शुभेच्छा देणे अपेक्षित नाही तर मोदी यांनी भारतामध्ये कसा बदल घडविला त्याचे चित्र उमटावे या पद्धतीने सदर उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.देशातील विविध जाती, धर्म, पंथाचे तसेच वेगवेगळ््या प्रदेशांचे लोक मोदी यांना वाढदिवसाच्या या हॅशटॅगवर शुभेच्छा देताना दिसावेत, अशी भाजप आयटी विभागाची अपेक्षा आहे.मोदींविषयी आदरभाव बाळगणारे करोडो लोक भारतात तसेच विदेशातही आहेत. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे भाजपच्या नेत्याने सांगितले. मात्र, समाजमाध्यमांवर मोदींना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हॅशटॅग सुरू करण्याची कल्पना भाजपतर्फे राबविली जात आहे, या आरोपाचा मात्र या नेत्याने इन्कार केला.उत्स्फूर्तपणे जनतेकडूनच सारे प्रयत्न- मोदींना आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जी मोहीम राबविण्यात येत आहे, त्याची पूर्वकल्पना नाही, असाही दावा या नेत्याने केला. हे सारे प्रयत्न जनतेकडूनच उत्स्फूर्तपणे सुरू आहेत, असेही त्याने सांगितले.- या मोहिमेबाबत भाजपच्या आयटी विभागाने संबंधित लोकांना व्हॉटस्अ‍ॅपवर दूरध्वनी करून माहिती दिली आहे. आपण ही मोहीम आखली आहे, याचा कोणताही डिजिटल पुरावा उपलब्ध होऊ नये याची काळजी भाजपचा आयटी विभाग घेत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा