शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

बिर्यानी आणि १०० रुपयासाठी 'तिने' ४२ बस जाळल्या ?

By admin | Updated: September 19, 2016 10:48 IST

कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन मागच्या आठवडयात बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या ४२ बसेस जाळण्यात आल्या.

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. १९ - कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन मागच्या आठवडयात बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तामिळनाडूच्या ४२ बसेस जाळण्यात आल्या. फक्त १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानीसाठी इतक्या मोठया प्रमाणावर बसेसची जाळपोळ करण्यात आल्याचा संशय आहे. 
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली असून, यात सी. भाग्या नावाच्या महिलेचा समावेश आहे. भाग्यावर बसेस जाळण्यासाठी जमावाला चिथावणी दिल्याचा संशय आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी तिला फक्त १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानीचे आश्वासन देण्यात आले होते. 
 
बस डेपोतील सीसीटीव्ही फुटेजवरुन भाग्या मुख्य चिथावणीखोर असल्याचा पोलिसांना संशय आहे.  भाग्या गिरीनगरमध्ये रहाते. १२ सप्टेंबरला दुपारी ती घरी आल्यानंतर तिच्या ओळखीचे काहीजण घरी आले. त्यांनी तिला आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले. त्यामोबदल्यात त्यांनी १०० रुपये आणि एक प्लेट बिर्यानी देण्याचे आश्वासन दिले असे भाग्याची आई यलम्माने सांगितले. 
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला दिसत असली तरी, ती जाळपोळीमध्ये सक्रीय असल्याचे स्पष्ट झालेले नाही. १२ सप्टेंबरला बंगळुरुमध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी ४०० जणांना अटक झाली. त्यामध्ये भाग्या एकमेव महिला आहे. सध्या तिची पोलिस कसून चौकशी करत आहेत. जाळपोळ करणा-यांमध्ये भाग्याचा समावेश असला तरी ती, जमावाचे नेतृत्व करत होती हे अजून स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांनी सांगितले.