शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:42 IST

मेरठमध्ये राहणाऱ्या तीन तरुणांनी सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी काय केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची क्रेझ अनेकदा लोकांना धोक्याच्या वाटेवर नेत असते. अशीच काहीशी घटना मेरठमध्ये घडली आहे. मेरठमध्ये राहणाऱ्या तीन तरुणांनी सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी काय केलं, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

बाईक रेल्वे रुळांवर पार्क केली अन्... 

या तरुणांनी त्यांच्या दुचाकीला रेल्वे ट्रॅकवर नेऊन उभी केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट बाईकच्या मागच्या चाकाला पेटवून, त्यावर स्टंटची दमदार रील शूट केली. त्या रीलमध्ये पेटलेल्या चाकातून उडणाऱ्या ठिणग्या , गाण्याचा जोरात आवाज, आणि हसणाऱ्या मित्रांचे आवाज हे सगळं थ्रिलिंग वाटत असलं तरी कायदेशीरदृष्ट्या त्या तरुणांना हे फारच महागात पडलं आहे.

ही घटना मेरठ-हापूर रेल्वे ट्रॅकवरील चांदसारा रेल्वे हॉल्टजवळ घडली. तरुणांचा हा व्हिडीओ एक्सवर अपलोड होताच व्हायरल झाला आणि जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी त्याची अतिशय गांभीर्याने दखल घेतली. या व्हिडीओचा तपास सुरू झाला आणि लवकरच व्हिडीओतील तिघांची ओळख पटली. या तीन तरुणांमध्ये फाफुंडा गावचा साहिर, शहजाद आणि त्यांच्या एका मित्राचा समावेश आहे.

पोलिसांनी घेतलं ताब्यात

तिघांनी बाईकच्या टायरवर पेट्रोलसारखा पदार्थ ओतून लायटरने आग लावली, मग बाईक स्टार्ट करून वेगाने चाक फिरवून सोशल मीडियासाठी रील बनवली. पण, हे थोडंसं हटके करण्याचं आणि झटक्यात प्रसिद्धी मिळवण्याचं आकर्षण त्यांच्या हातात बेड्या पडूनच संपलं.

दाखल झाले गुन्हे

रेल्वे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आणि हापूर आरपीएफकडे सुपूर्द केले. तिथून त्यांची थेट तुरुंगात रवानगी झाली. आता त्यांच्यावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, सार्वजनिक ठिकाणी अपायकारक कृत्ये, आणि रेल्वे कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जीआरपी इन्स्पेक्टर विनोद कुमार यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना सांगितले की, सोशल मीडियासाठी असे जीवघेणे स्टंट्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपला आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये,असा इशारा देखील त्यांनी दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश