काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योत कौर सिद्धू यांचा पक्षाला रामराम; भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 23:12 IST2026-01-31T23:10:56+5:302026-01-31T23:12:12+5:30

Navjot Kaur Sidhu Resign: नवज्योत कौर सिद्धू यांचा राजीनामा, राजा वडिंग यांना सुनावलं 'भ्रष्ट'. आता भाजपमध्ये जाणार का? वाचा सविस्तर...

Big blow to Congress! Navjot Kaur Sidhu quits party; Rumours are that she is on the path to BJP | काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योत कौर सिद्धू यांचा पक्षाला रामराम; भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योत कौर सिद्धू यांचा पक्षाला रामराम; भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता शिगेला पोहोचला असून, माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आणि माजी आमदार डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सुमारे सह महिन्यांपूर्वी पक्षाने त्यांचे निलंबन केले होते, त्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राजीनामा देताना त्यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.

डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपली पोस्ट शेअर करत राजा वडिंग यांना "आजवरचे सर्वात भयानक, अक्षम आणि भ्रष्ट अध्यक्ष" असे संबोधले. त्यांनी आरोप केला की, वडिंग यांनी स्वतःला तुरुंगापासून वाचवण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्षाशी (AAP) हातमिळवणी केली असून काँग्रेस पक्षाचे नुकसान केले आहे. "तुमच्याकडे माझ्यासाठी निलंबनाचे पत्र तयार होते, पण नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव करण्यासाठी अकाली दलाशी हातमिळवणी करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांवर तुम्ही कोणती कारवाई केली?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

५०० कोटींच्या बॅगेचा वाद
डिसेंबर २०२५ मध्ये एका मुलाखतीत डॉ. नवज्योत कौर यांनी विधान केले होते की, "काँग्रेसमध्ये ज्याच्याकडे ५०० कोटींची बॅग असते, तोच मुख्यमंत्री होतो." या विधानामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली होती, ज्यानंतर त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून त्या पक्षावर नाराज होत्या.

भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
काँग्रेस सोडल्यानंतर आता डॉ. नवज्योत कौर सिद्धू पुन्हा आपल्या जुन्या पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पंजाबमध्ये उधाण आले आहे. २०१२ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू दाम्पत्य काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : नवजोत कौर सिद्धू ने कांग्रेस छोड़ी; भाजपा में वापसी की अटकलें

Web Summary : नवजोत कौर सिद्धू ने कांग्रेस से इस्तीफा दे दिया, पंजाब कांग्रेस अध्यक्ष की आलोचना की। पहले निलंबित, उन्होंने उन पर भ्रष्टाचार और आप के साथ मिलीभगत का आरोप लगाया। चुनावों से पहले भाजपा में उनकी संभावित वापसी की अटकलें तेज हैं। उन्होंने पहले कांग्रेस पर भ्रष्टाचार का आरोप लगाया था।

Web Title : Navjot Kaur Sidhu Quits Congress; BJP Return Speculated

Web Summary : Navjot Kaur Sidhu resigned from Congress, criticizing the Punjab Congress President. Suspended months prior, she accused him of corruption and collusion with AAP. Her potential return to BJP sparks speculation ahead of elections. She had accused Congress of corruption previously.