शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला दे धक्का! बड्या नेत्याच्या घरवापसीवर दिदींकडून शिक्का; मोदींचा 'तो' कॉलही रोखू नाही शकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 16:48 IST

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुवेंदू अधिकारी तृणमूलमध्ये प्रवेश करणार; चार वर्षांनंतर घरवापसी

कोलकाता: विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. चार वर्षांपूर्वी तृणमूलची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले दिग्गज नेते मुकूल रॉय स्वगृही परतले आहेत. तृणमूल भवनमध्ये झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी मुकूल रॉयदेखील कार्यालयात हजर होते. याबद्दलची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली.बंगालमध्ये दिदींचा खेला! भाजपला मोठा झटका? बडा नेता घरवापसीच्या तयारीत; घडामोडींना वेगविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली. तृणमूल सत्ता गमावणार असं वाटू लागल्यानं अनेक आमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगमागे मुकूल रॉय यांचा हात होता. मात्र आता मुकूल रॉयच माघारी फिरल्यानं त्यांच्या गटातले बरेचसे आमदार पुन्हा तृणमूलमध्ये परतू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत बंगालमध्ये भाजपला बरेच धक्के बसण्याची शक्यता आहे.मोदींच्या 'त्या' कॉलनंतरही मुकूल रॉय यांनी सोडला भाजपमुकूल रॉय यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबद्दल मुकूल रॉय यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केला होता. मात्र त्यानंतरही रॉय यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुभ्रांशू रॉयदेखील तृणमूलमध्ये घरवापसी करणार आहे. मुकूल यांच्या पत्नीची ममता बॅनर्जींनी विविध माध्यमांतून चौकशी केली होती. त्यांना योग्य उपचार तातडीनं मिळावेत यामध्ये खुद्द ममता यांनी लक्ष घातल्याचं बोललं जातं.बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शनसुवेंदू अधिकारी यांचं वाढत प्रस्थ; मुकूल रॉय अस्वस्थमुकूल रॉय चार वर्षांपूर्वीच भाजपमध्ये गेले. त्यासाठी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ममता यांच्यानंतर पक्षात त्यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं. ममता सरकारमध्ये मंत्री असलेले सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात त्यांचं प्रस्थ वाढलं. सुवेंदू अधिकारी यांना विरोधी पक्षनेतेपदही देण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच अधिकारी मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे भाजपमध्ये बाजूला सारण्यात आल्याची भावना रॉय यांच्या मनात होती, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

टॅग्स :BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी