शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 16:39 IST

Lok Sabha Elections 2024: काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली.

पश्चिम बंगालमधील झारग्राम लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान भाजपा उमेदवार प्राणनाथ टुडू यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर विटा फेकण्यात आल्या. तसेच, केंद्रीय सुरक्षा दलांवरही हल्ला झाल्याचा आरोप आहे. गडबेटा येथे प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. तर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजपा परिसरात अशांतता पसरवत आहे.

काही मतदान केंद्रांवर भाजपा एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडवेटाला जात असताना ही घटना घडली. अचानक काही लोकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही टीएमसीच्या गुंडांनी गाडीवर विटा फेकण्यास सुरुवात केली, असा दावा प्राणनाथ टुडू यांनी केला. यावेळी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ते जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या दोन सीआयएसएफ जवानांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असे प्राणनाथ टुडू यांनी सांगितले.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त परिसरात पाठवण्यात आला होता. दुसरीकडे, याबाबत स्थानिक टीएमसी नेतृत्वाने आरोप नाकारले आणि प्राणनाथ टुडू यांच्यावर "शांततापूर्ण मतदान प्रक्रिया बिघडवण्याचा" प्रयत्न केल्याचा आरोप केला. स्थानिक टीएमसी नेत्याने सांगितले की, भाजपाचे उमेदवार मतदारांना धमकावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, जमावाकडून विविध माध्यमांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपा उमेदवाराच्या विरोधात 'गो बॅक'च्या घोषणा मोगलापाटा हे गाव झारग्रामच्या गडवेटा विधानसभा मतदारसंघात आहे. प्राणनाथ टुडू या परिसरात येताच जवळपास दीड ते दीडशे ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला आणि गो बॅकच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक विटा आणि दगडफेक करण्यात आली. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनली की, प्राणनाथ टुडू यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही ती हाताळता आली नाही.

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jhargram-pcझारग्राम