शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोना रुग्णांना दिलासा, बजाज हेल्थकेअरकडून 'Favijaj' टॅबलेट लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:55 IST

Bajaj Healthcare launches 'Favijaj' tablets for treating COVID-19 : बजाज हेल्थकेअरने (Bajaj Healthcare) आपले अँटीपारॅसॅटिक (Antiparasitic) औषध फविजाज (Favijaj) बाजारात आणण्याची घोषणा केली.

ठळक मुद्देडीसीजीआयने या टॅबलेटला देशांतर्गत आणि परदेशी बाजारात पाठविण्याची परवानगी दिली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे २ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, कोरोनामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. यातच एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय औषध निर्माता कंपनी बजाज हेल्थकेअरने (Bajaj Healthcare) आपले अँटीपारॅसॅटिक (Antiparasitic) औषध फविजाज (Favijaj) टॅबलेट  बाजारात आणण्याची घोषणा केली. हे औषध कोरोना संसर्गाच्या उपचारात वापरले जाऊ शकते.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पाठविलेल्या नोटिसमध्ये कंपनीने म्हटले आहे की, या औषधाच्या निर्मिती व विपणनासाठी याला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (Drugs Controller General of India)मान्यता मिळाली आहे. बजाज हेल्थकेअरने असे म्हटले आहे की, इव्हेरमॅक्टिनसाठी औषधी घटक आणि त्याचे फॉर्म्युलेशन स्वत: च्या संशोधन आणि विकास कार्यसंघाद्वारे यशस्वीरित्या विकसित केले गेले आहेत. डीसीजीआयने या टॅबलेटला देशांतर्गत आणि परदेशी बाजारात पाठविण्याची परवानगी दिली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

(Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट)

दरम्यान, जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 15 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे.

11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असे रिसर्चमध्ये म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास रुग्णांची आणि मृतांची संख्या ही आणखी वाढू शकते. कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यbusinessव्यवसायmedicineऔषधं