शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:41 IST

तरूणावर कारवाई केली जावी अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे

Kadhai Helmet viral video: सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकते. कधी एखादा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादा भावनिक व्हिडीओ चर्चेचे कारण बनतो. पण सध्या बंगळुरूतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये अनेकदा रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती केली जाते. मात्र, बंगळुरूमध्ये व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दंडाच्या भीतीने एका तरुणाने हेल्मेटऐवजी डोक्यावर चक्क स्वयंपाकाची कढई ठेवून प्रवास केला.

कढई हेल्मेटची अनोखी फॅशन होतेय व्हायरल

ही घटना बंगळुरूच्या एचएसआर लेआउट ट्रॅफिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अग्रहारा जवळची आहे. एका बाईकवर दोन युवक प्रवास करत होते. चालक तरुणाने नियमानुसार हेल्मेट घातले होते, मात्र त्याच्या मागे बसलेल्या मित्राकडे हेल्मेट नव्हते. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी मागे बसलेल्या तरुणाने चक्क ॲल्युमिनियमची कढई डोक्यावर उपडी ठेवली आणि ती हाताने घट्ट पकडून ठेवली.

पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न

लांबून पाहिल्यास ती चमकदार रंगाच्या हेल्मेटसारखी वाटत होती. मात्र, जवळून पाहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ सुमारे ५ महिने जुना असला, तरी सध्या तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारच्या घातक जुगाडवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Viral Video: Man uses cooking pot as helmet to evade police.

Web Summary : A Bengaluru man used a cooking pot as a helmet to avoid traffic police fines. The video, originally from 5 months ago, shows the man riding a bike with the pot on his head. The act has sparked calls for stricter action.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाTrafficवाहतूक कोंडी