Two Indian men shot dead in Italy News: एक धक्कादायक घटना इटलीमध्ये घडली आहे. दोन भारतीयांची एका गुरुद्वाराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला आहे. कारमधून आलेल्या आरोपींनी दहा गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले.
इटलीतील कोवोमध्ये असलेल्या एका गुरुद्वाराबाहेर भारतीय उभे होते. स्थानिक पोलीस या हल्ल्याचा तपास करत आहे. हत्या करण्यात आलेल्या भारतीयांची नावे राजिंद्र सिंग आणि गुरमीत सिंग अशी आहेत. हे दोघेही गुरुद्वारामध्ये बऱ्याच काळापासून सेवेकरी म्हणून सेवा करत होते.
हत्या करणारे भारतीयच?
पोलिसांनी सांगितले की, गोळीबार करणारे आरोपी मूळ भारतीय वंशाचेच आहेत. पोलिसांनी आता त्यांचा शोध सुरू केला आहे.
वैसाखीनिमित्त १८ एप्रिल रोजी गुरुद्वारामध्ये नगर कीर्तनाची तयारी सुरू होती. त्याची त्यासाठी सेवा करत होते. राजिंदर सिंग (वय ४८) हे कोवोमध्ये राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. गुरमीत सिंग हे अग्नाडेल्लो क्रीमोना येथे राहत होते. त्यांनाही दोन मुले आहेत.
कारमधून आले आणि गोळ्या झाडल्या
रात्री ११.३० वाजता समूह गुरुद्वारातून बाहेर पडत होते. त्याचवेळी एक कार आली. त्या कारमधून हल्लेखोर बाहेर आले आणि त्यांनी अचानक अंदाधूंद गोळ्या झाडल्या. दहा राऊंड फायर केल्याचे पोलिसांनी सांगितले. यात राजिंदर सिंग, गुरमीत सिंग आणि एक व्यक्ती जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. गुरमीत सिंग आणि राजिंदर सिंग यांचा मृत्यू झाला, तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी कारमधूनच फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. वादातून त्यांनी हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Summary : Two Indian men, Rajinder Singh and Gurmeet Singh, were fatally shot outside a Gurudwara in Italy. A third person was injured. Police suspect the shooters are of Indian origin and are investigating a possible dispute as the motive.
Web Summary : इटली में एक गुरुद्वारे के बाहर दो भारतीय पुरुषों, राजिंदर सिंह और गुरमीत सिंह, की गोली मारकर हत्या कर दी गई। एक तीसरा व्यक्ति घायल हो गया। पुलिस को संदेह है कि हमलावर भारतीय मूल के हैं और संभावित विवाद की जांच कर रहे हैं।