शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:31 IST

"लोकसभेत आमचे ३७.९% महिला सदस्य आहेत, तर राज्यसभेत ४६% महिला सदस्य आहेत. यामुळे महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि टीएमसीसह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रविवारी 'एक्स'वर पोस्ट करत, "पंतप्रधानांनी हा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याऐवजी देशाची दिशाभूल करण्याचा मार्ग निवडला, हे अत्यंत दुर्दैवी आहे," असे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "तृणमूल काँग्रेस (TMC) नेहमीच महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचे समर्थन करते. आमच्या पक्षात निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचे प्रमाण सर्वाधिक आहे. लोकसभेत आमचे ३७.९% महिला सदस्य आहेत, तर राज्यसभेत ४६% महिला सदस्य आहेत. यामुळे महिला आरक्षणाला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."

"हा संघराज्यीय लोकशाहीवरील हल्ला" -ममता बॅनर्जी यांनी परिसीमन प्रक्रियेवरही तीव्र आक्षेप घेतला. मोदी सरकार आपले हितसंबंध साधण्यासाठी महिलांना ढाल म्हणून पुढे करत आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील बदलांना, देशाच्या विभाजनाला आणि इतर राज्यांच्या किंतीवर भाजपशासित राज्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी राजकीय सीमांच्या फेररचनेला तीव्र विरोध करत आहोत. हा संघराज्यीय लोकशाहीवरील हल्ला आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

"विधेयक सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर होऊनही ३ वर्षे का थांबले?" -तसेच, हे विधेयक सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर होऊनही ३ वर्षे का थांबले? आणि निवडणुकांच्या तोंडावरच घाई का? ते मतदारसंघ पुनर्रचनेशी का जोडले? असे सवाल करत ममतांनी मोदींवर टीका केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee Counters Modi on Women's Reservation, Alleges Political Motives

Web Summary : Mamata Banerjee criticized Modi's remarks on women's reservation, asserting TMC's support but questioning the bill's delay and motives. She accused the government of using it for political gain and undermining federal democracy, opposing constituency restructuring linked to the bill.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी