शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:47 IST

America Iran War: अमेरिका इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरून संघर्ष वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

America Iran War: अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी उठवण्यास नकार दिल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करत या जलमार्गावर कडक निर्बंध लादले. यातच युद्धविराम मुदत संपण्याची तारीख जवळ आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धविरामाची मुदत वाढवणार की, इराणशी संघर्ष आणखी शिगेला पोहोचणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा शांतता चर्चा होण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजनैतिक घडामोड घडत आहे. दोन्ही देशांमधील चर्चेची पुढील फेरी पुढच्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे तारीख जाहीर केली नसली तरी, प्रत्यक्षातील काही घडामोडींवरून तसे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-१७ ग्लोबमास्टर III सह अमेरिकेची मोठी लष्करी विमाने इस्लामाबादच्या अगदी जवळ असलेल्या रावळपिंडीच्या नूर खान हवाई तळावर उतरली आहेत. इतकेच नव्हे तर, विमानतळापासून इस्लामाबादच्या रेड झोनकडे जाणारे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या भागातील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

इस्लामाबादमधील हॉटेल रिकामी केली जात आहेत

इस्लामाबादमधील प्रमुख हॉटेल्स, विशेषतः सेरेना हॉटेल आणि मॅरियट हॉटेल, रिकामी केली जात आहेत. नवीन बुकिंग्स स्थगित करण्यात आली आहेत. चर्चेची पहिली फेरी ११ एप्रिल रोजी सेरेना हॉटेलमध्ये झाली होती. आता अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्यांदा होणारी चर्चा २४ एप्रिल रोजी होऊ शकते, असे काही सूत्रांचे म्हणणे असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेच्या शेवटच्या फेरीपासून दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमार्फत सतत संपर्कात आहेत आणि पुढील फेरीपूर्वी सर्वोच्च सामंजस्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धविराम वाढवण्याची अनिच्छा पाहता, मुदत वाढवली जाईल की नाही हे अस्पष्ट आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमात पाकिस्तानची भूमिकाही निर्णायक ठरली आहे. असिम मुनीर यांनी अलीकडेच इराणला भेट दिली आणि इराण नेतृत्वाची भेट घेतली. या चर्चेत शांतता प्रस्थापित करण्यावर आणि संवादाद्वारे तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच म्हटले आहे की, इराणसोबत करार झाल्यास स्वाक्षरी करण्यासाठी ते स्वतः इस्लामाबादला येऊ शकतात. या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानची प्रशंसा केली होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : US planes land in Pakistan amid Iran conflict: What's brewing?

Web Summary : Amid US-Iran tensions, American military planes landed in Pakistan. Islamabad may host peace talks. Hotels are being emptied, hinting at high-level discussions. Pakistan is playing a crucial role in de-escalation efforts.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान