भारत सरकारने वरिष्ठ भाजप नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि बांगलादेश यांच्यात काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना आणि दोन्ही देश आपले संबंध संतुलित आणि मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने खेळलेली ही एक धोरणात्मक खेळी असल्याचे बोलले जात आहे.
असा आहे दिनेश त्रिवेदी यांचा राजकीय प्रवास -भाजपमध्ये येण्यापूर्वी दिनवेश त्रीवेदी है तृणमूल काँग्रेसमध्ये होते. ते युपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्रीही राहिले आहेत. २०२१ मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते प्रणय वर्मा यांची जागा घेतील. प्रणय वर्मा यांची नियुक्ती आता ब्रसेल्स येथे युरोपियन युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून करण्यात आली आहे.
बांगलादेशमधील अलीकडील सत्तापालट आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अस्थिरता, तसेच हिंदू समुदायावरील हल्ले यामुळे उभय देशांतील तणाव प्रचंड वाढला होता. मात्र, आता तारिक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर संबंध सुधारण्याचे संकेत मिळत आहेत.
कोण आहेत दिनेश त्रिवेदी? -त्रिवेदी यांचा दांडगा राजकीय अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य या कठीण काळात कामी येण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये रेल्वे भाडे वाढवल्यामुळे ममता बॅनर्जींशी झालेला वाद आणि त्यानंतर राजीनामा ही त्यांच्या कारकिर्दीतील एक मोठी घटना होती. ते २००९ ते २०१९ पर्यंत बॅरकपूरचे खासदार राहिले आहेत.
Web Summary : BJP leader Dinesh Trivedi is appointed as India's High Commissioner to Bangladesh, replacing Pranay Verma. This strategic move occurs amidst discussions between the two nations and ahead of West Bengal elections. Trivedi's experience is crucial amid political shifts.
Web Summary : भाजपा नेता दिनेश त्रिवेदी बांग्लादेश में भारत के उच्चायुक्त नियुक्त हुए। प्रणय वर्मा की जगह लेंगे। यह कदम भारत-बांग्लादेश के बीच चर्चा और बंगाल चुनाव से पहले उठाया गया। राजनीतिक उथल-पुथल के बीच त्रिवेदी का अनुभव महत्वपूर्ण है।