उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या ‘गर्लफ्रेंड’च्या नावाखाली ६९ वर्षीय वृद्धाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांची लूट करण्यात आली. या प्रकरणाने डिजिटल जगातील धोके पुन्हा एकदा समोर आणले आहेत.
प्रेमाच्या नावाखाली रचला सापळा
बिजनौर शहरातील विरेंद्र भटनागर (वय ६९) यांची ओळख एका डेटिंग अॅपवर ‘बेबी’ नावाच्या प्रोफाइलशी झाली. या प्रोफाइलमागे समीर नावाचा आरोपी असल्याची माहिती पुढे आली. विश्वास बसावा म्हणून टोळीतील मुलींकडूनही वृद्धाशी संवाद साधला जात होता. हळूहळू त्यांचा विश्वास जिंकण्यात आला आणि शेवटी भेटण्याचा प्लॅन आखण्यात आला.
फार्महाऊसवर नेलं अन्..
१७ एप्रिल २०२६ रोजी ठरल्याप्रमाणे विरेंद्र भटनागर भेटीसाठी गेले. आरोपी मोनिश त्यांना बाइकवर बसवून एका सुनसान फार्महाऊसवर घेऊन गेला. तेथे आधीपासूनच दबा धरून बसलेल्या समीर, आकिल, अनस, फरहान आणि फरदीन यांनी त्यांना घेरले. वृद्धाला मारहाण करत जीव घेण्याची धमकी देण्यात आली. यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि अंगठी हिसकावून घेण्यात आली. इतकेच नाही, तर मोबाईल हिसकावून ‘फोन-पे’चा पासवर्ड जबरदस्तीने घेऊन त्यांच्या खात्यातून ६५ हजार रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
पोलिसांची जलद कारवाई, चौघे जेरबंद
घटनेनंतर १८ एप्रिलला पीडिताच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली. बिजनौर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत मोनिश, समीर, आकिल आणि अनस या चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फरहान आणि फरदीन हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
चौकशीत उघड झाला मोठा कट
मुख्य आरोपी समीरने चौकशीत कबूल केले की, ही संपूर्ण योजना हनीट्रॅपच्या माध्यमातून आखण्यात आली होती. श्रीमंत आणि एकटे राहणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणे हा या टोळीचा उद्देश होता. ही घटना पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सच्या वापरातील धोके अधोरेखित करते. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, याचा हा जिवंत उदाहरण ठरतो. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अॅप्सचा वापर करताना सतर्क राहावे आणि कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये.
Web Summary : A 69-year-old man in Bijnor was honeytrapped via a dating app. He was lured to a farmhouse, robbed of valuables, and had ₹65,000 transferred from his account. Police arrested four suspects involved in the scheme targeting wealthy, lonely seniors.
Web Summary : बिजनौर में 69 वर्षीय व्यक्ति डेटिंग ऐप के माध्यम से हनीट्रैप का शिकार हो गया। उसे एक फार्महाउस में ले जाया गया, कीमती सामान लूट लिया गया, और उसके खाते से ₹65,000 ट्रांसफर कर दिए गए। पुलिस ने अमीर, अकेले बुजुर्गों को लक्षित करने वाली योजना में शामिल चार संदिग्धों को गिरफ्तार किया।